Robbery  esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : लग्न सोहळ्याच्या 20 तोळे दागिन्यांसह रोकड लंपास

घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील देवपूर भागातील प्रभातनगरमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे गुरुवारी (ता. २) सकाळी उघडकीस आले. चोरट्यांनी घरातून ३६ हजारांची रोकड व २० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

प्रभातनगरमधील प्लॉट क्रमांक दहामध्ये गोरख महादू शिंपी यांचे वास्तव्य आहे. ते येथील एमआयडीसीत कामाला आहेत. त्यांच्या पत्नी खानावळ चालवितात. बुधवारी (ता. १) उकाड्यामुळे शिंपी कुटुंबीय घराच्या छतावर झोपले होते. सकाळी सहाला श्री. शिंपी खाली आले. दरवाजा उघडून ते बाहेर गेले. हीच संधी साधत चोरट्याने घरात शिरून कपाटातून ३६ हजारांची रोकड व मुलीच्या लग्नाचे सोन्याचे टॉप्स, दोन अंगठ्या, मंगळसूत्र आणि साखळ्या, असे तब्बल २० तोळ्यांचे दागिने चोरून नेले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच शिंपी यांनी देवपूर पोलिसांना कळविले. माहिती मिळताच देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोतीलाल निकम यांनी पथकासह भेट देत पाहणी केली. या घटनेने मात्र शिंपी कुटुंबीयांवर संकट कोसळले. शिवाय परिसरातही चोरीच्या या घटनेने दहशत निर्माण झाली. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT