Goods worth three lakh seized along with a pikup vehicle nandurbar crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : 3 लाखांचा मुद्देमाल पिक-अपसह जप्त

तालुक्यातील जावदे त.ह.-मंदाणे रस्त्यावर पोलिसांनी पाळत ठेवत पिक-अप वाहनासह दोन लाख ९९ हजार ६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : तालुक्यातील जावदे त.ह.-मंदाणे रस्त्यावर पोलिसांनी पाळत ठेवत पिक-अप वाहनासह दोन लाख ९९ हजार ६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली. (Goods worth three lakh seized along with a pikup vehicle nandurbar crime news)

जावदे-मंदाणे रस्त्यावर मंगळवारी शेतातील पत्र्याच्या शेडसमोर विविध प्रकारच्या मसाल्याची चोरटी वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येत असताना कारवाई करण्यात आली.

त्यात ९९ हजार ६६ रुपयांचा पानमसाला व दोन लाख रुपये किमतीचे पिक-अप वाहन असा एकूण दोन लाख ९९ हजार ६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत शहादा पोलिसांनी कारवाई केली.

त्यात संशयित आरोपी मांगीलाल किसनलाल शर्मा (वय ४७, रा. मंदाणा) याच्याविरुद्ध अन्नसुरक्षा मानके अधिनियमाप्रमाणे शहादा पोलिस ठाण्याचे घनश्याम विठ्ठल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व अभिजित आहिरे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT