उत्तर महाराष्ट्र

धान्याच्या राशींतून वंचितांच्या मुखी घास

नरेंद्र जोशी

नाशिक - समाजातील विविध वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांच्या शिध्याची (धान्य) तहहयात जबाबदारी नाशिकच्या महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली असून, ‘वुई टुगेदर’ या संस्थेच्या माध्यमातून त्या धान्य बॅंकेचा उपक्रम राबवीत आहेत. वंचित संस्थाच्या मदतीसाठी वर्षभर हे धान्य वापरले जाते. 

मागील महिन्यात डॉ. कीर्ती हातवळणे, दुर्गा पुराणिक, अदिती गोखले, प्रतिभा कुलकर्णी, गौरी ओक, मनीषा विंचूरकर यांनी ‘वुई टुगेदर’ची स्थापना केली. आज ५० महिला या संस्थेच्या सभासद आहेत. वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांना तहहयात शिधा  (धान्य) पुरविण्याची जबाबदारी या गटाने उचलली आहे. या  गटाने शांतिवन व श्रद्धा फाउंडेशन या संस्था दत्तक घेतल्या  आहेत. 

शांतिवन ही ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करते. पालक कामानिमित्त भटकत असले, तरी ही मुले एकाच ठिकाणी राहावीत, त्यांना दोन वेळचे जेवण, चांगले शिक्षण घेता यावे हा त्यामागचा हेतू आहे. 

स्मृती हरवलेल्या आणि भ्रमिष्ट होऊन कोठेही भटकत राहणाऱ्या वृद्धांसाठी काम करणाऱ्या श्रद्धा फाउंडेशनलाही मदतीचा हात दिला आहे. वैद्यकीय उपचार आणि दोन वेळच्या राहण्या-जेवण्याची मोफत सोय ही संस्था करते. 

...अशी आहे ‘धान्य बॅंक’!
दरमहा ५० रुपये अथवा वर्षाचे सहाशे रुपये भरून किंवा दरमहा एक किलो धान्य देऊन महिलांना या धान्य बॅंकेचे सक्रिय सभासद करून घेतले जाते. आपल्या संस्कृतीमधील गृहिणी अनेक गुणांनी समृद्ध आहेत. या गृहिणींकडे असलेल्या सामर्थ्याची त्यांना ओळख करून देत, सामाजिक कामांशी त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची आज समाजाला आवश्‍यकता आहे. गृहिणींना पाठिंबा देत, त्यांची हिंमत व हुरूप वाढविण्यासाठी हा गट प्रयत्नशील आहे.

धान्य बॅंकेला महिलांनी कमीत कमी एक किलो धान्य द्यायचे. धान्य द्यायचे नसेल तर धान्यासाठी किमान ५० रुपये महिना द्यायचे, अथवा वर्षाचे सहाशे रुपये जमा करायचे. यातून चांगले काम करणाऱ्या संस्थांना मदतीचा हात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- डॉ. कीर्ती हातवळणे, वुई टुगेदर संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT