उत्तर महाराष्ट्र

Gram panchayat election : नंदूरबार जिल्ह्यात ८० टक्के शांततेत मतदान;उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

धनराज माळी

नंदुरबार : जिल्‍ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) प्रत्यक्षात मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. चोख पोलिस बंदोबस्त, कोविड नियमांचे पालन, प्रत्येक मतदारांचे तापमान तपासणी व सॅनिटायझरचा वापर करीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी भालेर, मोहिदा व कोपर्ली या केंद्रांना भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली.

 
जिल्ह्यातील ८७ पैकी २३ ग्रामपंचायती यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. त्यात खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक आयोगाने लिलाव प्रकरणी रद्द केली आहे. त्यामुळे आता बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या २२ झाली आहे. उर्वरित ६४ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले.

सकाळी साडेसातपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी कामावर जाणाऱ्या व शेतकऱ्यांनी मतदानासाठी रांग लावली होती, तर काही ठिकाणी सकाळी साडेदहापर्यंत केवळ ३-४ टक्के मतदान झाले होते. मात्र नंदुरबार तालुक्यातील भालेर, कोपर्ली, हाटमोहिदा या मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी दुपारी मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. त्यामुळे मतदारांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले. 

मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मतदारांची तापमान मोजणी, तसेच सॅनिटाझर लावून मतदानासाठी प्रवेश दिला जात होता. त्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली होती. काही केंद्राबाहेर सॅनिटायझर ठेवले होते. दोन मतदारांमध्ये तीन मीटरच्या अंतरावर गोल आखले होते. सोमवारी (ता. १८) तालुकानिहाय तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. सकाळी दहाला मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रियेचे नियोजन केले आहे.

नंदुरबार जिल्‍ह्यात ८० टक्‍के मतदान 
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी 

अक्‍कलकुवा- ८१.३० 
अक्रानी- ६१.९७ 
तळोदा- ७९.२४ 
शहदा- ७३.०९ 
नंदुरबार- ८२.४७ 
नवापूर- ८७.१२ 
एकूण जिल्‍हा मतदान टक्‍केवारी ८०.४९

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT