By visiting the grass tea project and getting information esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Ganeshotsav : तळोद्यात साकारला गवती चहा प्रकल्प..! गणेशमंडळाची सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Ganeshotsav : येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाने गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंडळाने गवती चहा प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय खत व गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला भेट देऊन याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यास प्राधान्य दिले आहे.

अशिक्षित महिलांना सॅनिटरी पॅडचे महत्त्व समजावून सांगत त्यांना पॅडचे वाटप केले आहे. शिवाजी महाराजांकडून अफजलखानाचा वध हा सजीव देखावा सादर केला आहे. मंडळाच्या विविध उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Grass tea project implemented in Taloda nandurbar news)

येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेशमंडळ नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी गणेशोत्सवात नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवीत असते. यंदादेखील मंडळाने शेतकऱ्यांना लघुउद्योग तसेच शेतीपूरक व्यवसायाची माहिती व्हावी यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.

निवृत्त पोलिस उपनिरीक्षक रमेश पिंपरे यांच्या गवती चहाप्रक्रिया उद्योगाला तसेच भिका चौधरी यांच्या सेंद्रिय खत व गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पास मंडळातील सदस्य, परिसरातील शेतकऱ्यांनी भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानुसार आपापल्या परीने शेतात असे उपक्रम राबविण्याचा निश्चय केला. यातून शेतकऱ्यांना व्हॅल्यू ॲडेड मूल्यवर्धित शेती उद्योग, शेतीपूरक व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळेल, असे बोलले जात आहे.

विविध समाजोपयोगी उपक्रम

मंडळाने एक अनोखा उपक्रम राबवीत मंडळातील महिला सदस्यांकडून वंचित घटकातील तसेच अशिक्षित महिलांना सॅनिटरी पॅडचे उपयोग व महत्त्व स्पष्ट करून त्यांचे वाटप केले. मंडळातर्फे भारती पवार यांनी स्त्रियांचे आरोग्य व मासिक पाळी याबाबत शुभ-अशुभ, श्रद्धा-अंधश्रद्धांबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली. शाडूपासून गणेशमूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळा झाली.

मंडळातील सदस्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचप्रमाणे शहरातील ऐतिहासिक वारसा असलेली बारगड गढीत गड, किल्ले संवर्धनांतर्गत साफसफाई केली. सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोशाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, मंडळाचे सदस्य व गणेशभक्त यांनी परिश्रम घेतले.

सजीव देखावा आकर्षण

मंडळाने सामाजिक प्रबोधनाचा सजीव देखावा सादर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त मंडळाने शिवाजी महाराजांकडून अफजलखानाचा वध हा सजीव देखावा सादर केला आहे. सजीव देखाव्याने तळोदेकरांना भुरळ घातली असून, देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त मोठी गर्दी करीत आहेत. सजीव देखाव्यात सादरीकरण करणारे सर्व जण अतोनात मेहनत घेऊन एक चांगला संदेश यानिमित्ताने सर्वांना देत आहेत.

असंख्य पारितोषिके

श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेशमंडळाने गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवीत व देखावे सादर करीत आतापर्यंत असंख्य पारितोषिक मिळविलेली आहेत. त्यात प्रथम क्रमांकाचे सर्वाधिक पारितोषिक असून, तालुकास्तरापासून ते राज्यस्तरीय पुरस्कार मंडळाने मिळविली आहेत. त्यामुळेच श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेशमंडळाचे पोलिस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून नेहमीच कौतुक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT