Gutkha
Gutkha 
उत्तर महाराष्ट्र

दोन लाखांचा गुटखा पकडून गुन्हाच दाखल होईना!

सकाळवृत्तसेवा

जळगाव - पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा जप्त करून दोन संशयितांसह एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी येऊन फिर्याद देणे अपेक्षित असताना या विभागाचे पथक येऊन पाहणी करून गेले, मात्र त्यापुढे कारवाई झालेली नाही. फिर्याद देण्याइतपतही अन्न- औषध प्रशासनाकडे वेळ नाही का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २६ डिसेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास भुसावळहून जळगावकडे येणाऱ्या वाहनाला पोलिस पथकाने खेडी गावाजवळ थांबवून तपासणी केली. या वाहनांतून दोन लाखांचा गुटखा नेला जात होता. चौकशीदरम्यान गुटखा विक्रेता संजय सुंदरलाल दुसेजा (रा. सिंधी कॉलनी जळगाव) व विक्की अशोक सालेज (रा. भुसावळ) यांचे नाव निष्पन्न होऊन त्यांना ताब्यात घेण्यातही आले होते. पथकाने पुढील कारवाई म्हणून तत्काळ भुसावळ गाठत रात्री उशिरापर्यंत गोदामांची तपासणी केली. 

प्रकरणात फिर्यादच नाही
नियमानुसार गुटख्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आवश्‍यक असल्याने त्यांना पाचारण करून मालाची मोजणी केल्यावर २ लाखांच्या घरात हा गुटखा असल्याचे निष्पन्न झाले. रीतसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पत्रही अन्न औषध प्रशासनाला दिले. बारा दिवस उलटूनही अद्यापपर्यंत मात्र या प्रकरणी गुन्हाच दाखल होऊ शकला नाही. 

आयुक्तांनी कॉलच घेतला नाही
घडल्या प्रकरणाची चौकशी केल्यावर पोलिसांतर्फे नियमाने पत्र व्यवहार करण्यात आला आहे, तरी फिर्याद का दाखल केली नाही म्हणून कार्यालयात संपर्क केला तेव्हा, कार्यालयात कोणीही अधिकारी हजर नव्हते. हजर असलेल्या अधिकाऱ्यांकडे गुटख्याची कारवाईची जबाबदारी नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून सहाय्यक आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांना संपर्क साधला असता त्यांनी कॉलच घेतला नाही.

पकडलेल्या गुटख्याची अन्न औषध विभागाने मोजणी केली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्याशी व्यवहार केला होता. मात्र, नंतर त्यांचा कुठलाही अधिकारी तक्रार देण्यास आला नाही. 
- रणजित शिरसाठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT