crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : गुटख्याची तस्करी; मालेगावमधील प्रवासी धुळ्यात ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधून गुटख्याची तस्करी करणाऱ्या मालेगावच्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजारांचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.

त्याच्यावर सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.(Gutkha smugglers from Madhya Pradesh bus were arrested by police dhule crime news )

सोनगीर पोलिसांचे पथक व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोनगीर टोलनाक्यावर बस (एमपी ११, पी ५१६९) थांबविली. बसमधील संशयित प्रवाशाला ताब्यात घेतले.

त्याने त्याचे नाव अल्ताफ अहमद सिराज अहमद मोमीन (वय ४५, रा. अकील रहेमान मशीद, घर नं. ६, मिल्लतनगर, नयापुरा वॉर्ड, मालेगाव) असे सांगितले.

त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात पानमसाला व सुगंधित तंबाखू मिळाली. यात एकूण ३० हजार ५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या तक्रारीवरून संशयित अल्ताफ याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र महाले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT