late bebitai saner
late bebitai saner esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : हातेड येथील ५० वर्षीय महिलेची अनेर नदीमध्ये आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

बभळाज (जि. धुळे) : शिरपूर चोपडा रस्त्यावरील तोंदे गावाजवळील अनेर नदीच्या पुलावरून हातेड (ता.चोपडा) येथील ५० वर्षीय महिलेने शनिवारी (ता.१३) सकाळी दहाच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. थाळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Hated 50 year woman commits suicide in Aner river Dhule Latest Marathi News)

घटनेची माहिती थाळनेर पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. संबंधित महिलेची तपासणी केली असता या महिलेकडे रोख बत्तीस हजार रुपये व हातेड ते गलंगी असे बसचे तिकिट आढळले. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता ही महिला हातेड (ता. चोपडा) येथील बेबाबाई शिवाजी सनेर (५०) असल्याचे निष्पन्न झाले.

बेबाबाई या शिवाजी भीमराव सनेर यांच्या पत्नी तर मिलिंद शिवाजी सनेर यांच्या आई होत्या. मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे पाठविण्यात आला. महिलेजवळ मिळालेली रक्कम बत्तीस हजार रुपये पतीच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे यांनी सांगितले.

पुढील तपास स.पो.नि. उमेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय ठाकुर करीत आहेत तालुक्यातील सावळदे व सुकवद वरील तापी पुलानंतर आता अनेर नदीवरील पुल हा आत्महत्या करण्याचे ठीकाण ठरणार का अशी भीती परीसरात व्यक्त करण्यात येत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT