साक्रीत महिलेचा निघृण खून; संशयित ताब्यात sakal media
उत्तर महाराष्ट्र

साक्रीत महिलेचा निघृण खून; संशयित ताब्यात

महिलेचा मृतदेह एका शेताच्या बांधावर पुरण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

साक्री : नवडणे (ता. साक्री) येथे महिलेचा निघृण खून करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (ता.२१) उघडकीस आला. सदर महिलेचा मृतदेह एका शेताच्या बांधावर पुरण्यात आला होता. ही घटना १५ मार्चला रात्री साडेअकरा ते पहाटे सहा वाजेच्या दरम्यान घडली असून शेतात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. कपड्यांवरून महिलेची ओळख पटली असून या प्रकरणी साक्री पोलिसांनी संशयिता विरुद्ध गुन्हा नोंदवीत त्यास ताब्यात घेतले आहे.

नवडणे शिवारात सोमवारी (ता. २१) सकाळी महिलेचा अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर घटना गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, पोलिस निरीक्षक अजयकुमार चव्हाण, सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड हे देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढत पंचनामा करण्यात आला. मृत महिलेची तिच्या कपड्यांवरून ओळख पटली. अनसूया अहिरे (वय २३ रा. नवडणे) असे मयत महिलेचे नाव आहे. मृत महिलेचा पती सोनू साहेबराव अहिरे याने पोलिसात फिर्याद देत गुन्हा दाखल केला.

यात संशयित अशोक सोनवणे हा मृत महिलेला नेहमी वाईट नजरेने पाहत असे, म्हणून त्याने तिला घरातून जबरीने घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्ती केली असावी व त्यानंतर तिच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून करत तिचा मृतदेह गाव शिवारातील रामा माणिक सोनवणे यांच्या शेताच्या बांधाजवळ पुरला असावा असा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित अशोक सतीश सोनवणे (वय २१, रा.नवडणे) यास ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अजयकुमार चव्हाण, सहाय्यक निरीक्षक हनुमंत गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT