Hemophilia  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आता सर्वच जिल्ह्यात हिमोफिलिया डे-केअर सेंटर; रुग्णांच्या आयुर्मानात वाढ

राज्यात नऊ हिमोफिलिया डे केअर सेंटरद्वारे ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर, सातारा, मुंबई व पुणे येथील जिल्हा रुग्णालयात सेवा उपलब्ध होती.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : राज्यात नऊ हिमोफिलिया डे केअर सेंटरद्वारे ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर, सातारा, मुंबई व पुणे येथील जिल्हा रुग्णालयात सेवा उपलब्ध होती. आता प्रत्येक जिल्ह्यातच ही सेवा उपलब्ध झाली आहे.

हिमोफिलियाग्रस्तांना जगण्यास मोठा आधार मिळाला आहे. (Hemophilia day care centers in all districts Increase life expectancy of patients dhule news)

सर्व जिल्ह्यांमध्ये हिमोफिलिया रुग्णांसाठी आवश्यक असणारे अॅंटी हिमोफिलीक फॅक्टरर्स उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत हिमोफिलिया डे-केअर सेंटर वगळता उर्वरित रायगड.

पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, परभणी, हिंगोली, बीड.

नांदेड, लासूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या २७ जिल्ह्यांमध्ये रुग्णसेवा उपलब्ध झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर कार्यान्वित होत आहेत.

जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र विभाग

हिमोफिलिया रुग्णांच्या उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्धतेचे आदेश झाले आहेत. रुग्णांचे रक्त तपासणीमध्ये निश्चित निदान झालेले असावे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत देण्यात आलेल्या हिमोफिलियास कार्डधारक फॅक्टर देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

"राज्यात साडेपाच हजारांवर हिमोफिलियाग्रस्त आहेत. खानदेशात दोनशेवर रुग्ण आहेत. त्यांना उपचार आणि फॅक्टरसाठी विभागातील जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. आता जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्ण दगावण्याचे किंवा दिव्यांगत्व वाढण्याचे प्रमाण कमी होणार आहे." -स्वप्नील जाधव, मुख्य प्रवर्तक, हिमोफिलिया सोसायटी, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT