High Court lifted stay on works approved under Tourism Development Scheme nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : मंजूर कामांची स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांची उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांची उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली आहे.

त्यामुळे नंदुरबार तालुक्यातील साडेसाती मुक्ती श्रीक्षेत्र शनिमांडळचा विकास होणार असून, त्यासाठी तीन कोटी नऊ लाख ९३ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. (High Court lifted stay on works approved under Tourism Development Scheme nandurbar news)

याबाबत माजी आमदार रघुवंशी यांनी सोमवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

त्यानंतर काही निविदांना तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे कामांना स्थगिती देण्यात आली होती; परंतु आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने सरसकट स्थगिती उठविण्यात आलेली आहे.

कामात कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या एकमेव साडेसाती मुक्तिपीठ श्रीक्षेत्र शनिमांडळ येथे पर्यटन विकास विभागाकडून विकासकामांना लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.

त्यामुळे शनिभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही तांत्रिक मुद्द्यांमुळे कामांच्या निविदांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे विकासकामे होऊ शकली नाहीत.

आता उच्च न्यायालयानेच स्थगिती उठविल्यामुळे विकासकामे होतील. शनिमांडळ गावातील नदी ते शनी मंदिरापर्यंत ट्रिमिक्स पद्धतीने रस्ता तयार करणे, मंदिर चौक सिमेंट ट्रिमिक्स करणे त्याचप्रमाणे गावातील रस्त्यांवर पथदीप बसविण्यात येतील.

त्यासाठी तीन कोटी नऊ लाख ९३ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT