Young farmer Munna Pawar with a pair of bullocks worth two and quarter lakhs esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : सव्वादोन लाखांची खिल्लारी बैलजोडी पाळण्याचा छंद

जगन्नाथ पाटील

कापडणे (जि. धुळे) : शेती मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीने होऊ लागली आहे. त्यामुळे बैलजोड्यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा ७० टक्के कमी झाले आहे. बहुतांश शेतकरी हंगामी बैलजोड्या पाळत आहेत. हंगाम संपला म्हणजे बाजाराची वाट धरतात. या बैलजोड्या साधारण ५० ते ६० हजारापर्यंतच्या असतात.

महागड्या बैलजोड्या पाळणे आता दुर्मिळ झाले आहे. मात्र येथील निवृत्त मुख्याध्यापक सुनील पवार व युवा शेतकरी मुन्ना पवार यांना लाखाची नव्हे, तर तब्बल सव्वादोन लाखांची बैलजोडी पाळण्याचा छंद जडला आहे. म्हणतात ना हौसेला मोल नसते. (hobby of rearing pair of Khillari bullocks worth two quarter lakhs of farmer from dhule latest marathi news)

येथील निवृत्त मुख्याध्यापक सुनील पवार व त्यांचे पुत्र मुन्ना पवार आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करतात. यंत्राच्या साह्याने शेती करणे परवडणारे आहे, पण शेतीला बैलजोडीची पारंपरिक जोड देणे आवश्यक आहे.

तरच शेती पूर्णत्वास येते, असे दोन्ही पितापुत्रांचे मत आहे. त्यानुसार त्यांनी आजही बैलजोडी टिकवून ठेवली आहे. त्यांनी लाखाची नव्हे, तर तब्बल सव्वादोन लाखांची बैलजोडी पाळली आहे. त्यांच्या देखभालीसाठी ते मोठा खर्च करतात.

शेतीची अधिक कामेही या बैलजोडीने करवून घेतात. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी पाच ते सहा बैलजोड्या बदलविल्या आहेत. उन्हाळ्यात शेतीची अधिक कामे नसतात. तेव्हाही बैलजोडीची विशेष काळजी घेतात.

पोळ्याला बैलजोडीची वाजतगाजत मिरवणूक

पवार कुटुंबाला गेल्या २० वर्षांपासून महागड्या बैलजोडींचा छंद जडला आहे. पोळ्याला स्वखर्चाने वाजतगाजत मिरवणूक काढतात. इतर शेतकऱ्यांच्या बैलजोड्या समाविष्ट करून घेतात. पोळ्याच्या सायंकाळी बैलजोडी पूजनानंतर सालदारांना पुरणपोळीची मेजवानी देतात.

"मला खिल्लारी बैलजोडी पाळण्याचा छंद आहे. ही जोडी चाकणमधून खरेदी केली आहे. खानदेशात केवळ चाळीसगावच्या बाजारातच खिल्लारी बैल उपलब्ध होत असतात."

-मुन्ना पवार, युवा शेतकरी, कापडणे (ता. धुळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

Latest Marathi News Live Update : निलंबित कर्मचाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Viral Video Fact Check: बेघर होऊन भीक मागताना सापडलेली महिला खरंच क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी? काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT