igatpuri nuksan.jpg 
उत्तर महाराष्ट्र

परतीच्या पावसाने इगतपुरीत शेतीचे प्रचंड नुकसान

ज्ञानेश्वर गुळवे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अस्वली, नांदूरवैद्य, कुऱ्हेगाव, नांदगाव बु, साकुर,गोंदे दुमाला, जानोरी,पाडळी, कृष्णनगर,लक्ष्मीनगर,समनेरे,माळुंजे,वाघेरे या तसेच मोडाळे, शिरसाठे,सांजेगाव,आहुर्ली, मुरंबी, गावात मंगळवारी (ता.३०) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह जोरदार परतीच्या पावसाला सुरुवात झाली. तसेच मध्यरात्री १२.३० वाजता पुन्हा जोरदार पाऊस पडला. सुमारे तासभर पडलेल्या पावसाची ११ मिमी नोंद करण्यात आली. त्यामुळे काढणीस आलेल्या भातपिकासह शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तातडीने पंचनामे करा; आमदार खोसकरांची मागणी

तालुक्यातील सोयाबीन, नागली,वरई, द्राक्ष बागांसह टोमॅटो सारख्या बागायती पिकांचे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना भाकड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! IT शेअर्सचा जोरदार कमबॅक; पाहा कोणते शेअर्स वाढले?

T20 WC, IND vs ZIM: टिम इंडियात ट्विस्ट... संघाचा विश्वासार्ह फिनिशर परतला; आता समीकरणच बदलणार?

आमच्यामध्ये वाद आहेत... भावासोबतच्या नात्यामधील तणावावर पहिल्यांदाच बोलला अजिंक्य देव; म्हणाला- एक भाऊ म्हणून ...

केंद्राकडून निधी मिळेना, मंत्र्यांचं रडगाणं; पाठपुरावा करा म्हणत राहुल नार्वेकरांनी विधानसभेत दोन नेत्यांना फटकारलं

SCROLL FOR NEXT