उत्तर महाराष्ट्र

शिक्षकांचा आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत

सकाळवृत्तसेवा

प्राथमिक शिक्षकांचे बालशिक्षण व संगोपन याबाबत मार्गदर्शन मिळणार

इगतपुरी - अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. येत्या तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.

अंगणवाडीतील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुले शैक्षणिकदृष्ट्या परिपक्व व्हावी, यासाठी आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीतील बालकांसाठी द्यावा लागणार आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांसाठी पुण्याच्या विद्या प्राधिकरणाच्या समन्वयाने पूर्व शालेय शिक्षणासाठी आकार अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची मदत घ्यावी लागणार आहे. यादृष्टीने प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडी सेविकेला प्राथमिक शिक्षण स्तरावरील शैक्षणिक गरजा विचारात घेऊन मार्गदर्शन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत.

आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करून संबंधित अंगणवाडी सेविकेला मार्गदर्शन करावे लागणार आहे. शाळेत साजरे होणारे विविध उत्सव, समारंभ, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आदी कार्यक्रमांच्या वेळी अंगणवाडीतील मुलांना बोलावून त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे लागणार आहे. प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अंगणवाडी केंद्रामधील तीन ते चार वर्षे, चार ते पाच वर्षे व पाच ते सहा वर्षे या वयोगटांप्रमाणे आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबतची खात्री अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना करावी लागणार आहे. 
आकार अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या मुलांना शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर या मुलांना पहिल्या वर्गात सहजपणे प्रवेश मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामान खात्याची मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT