Superintendent of Police Shrikant Dhiware, Deputy Superintendent of Police Sachin Hire, Inspector A. S. Agarkar etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वाडीजवळ अवैध मद्याचा ट्रक जप्त; संशयित फरारी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : केवळ पंजाबमध्ये विक्रीची परवानगी असलेल्या मद्यसाठ्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक शहर पोलिसांनी सोमवारी (ता. ४) रात्री वाडी (ता. शिरपूर) गावाजवळ जप्त केला.

या कारवाईत ट्रक व मद्यसाठा मिळून ७९ लाख २१ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. (Illegal liquor truck seized near Wadi dhule crime news)

संशयित चालक मात्र फरारी झाला. पोलिस अधीक्षकांनी शिरपूरला भेट देऊन पोलिसांचे कौतुक केले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मध्य प्रदेशातून बोराडी-वाडीमार्गे मद्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक हेमंत खैरनार व शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांनी वाडी गावाजवळ सापळा रचला.

रात्री अकराला वाडीकडून शिरपूरकडे येणाऱ्या आयशर ट्रक (आरजे ११, जीएच ८४८२)ला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहून चालकाने ट्रक बोराडी गावाकडे परत फिरविला. काही अंतरावर ट्रक उभा करून अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला.

ट्रक जप्त करून पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात आणला. ट्रकच्या झडतीमध्ये वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या बाटल्यांचा साठा आढळला. या मद्यसाठ्याची किंमत ४९ लाख २१ हजार १८० रुपये आहे.

ट्रकसह एकूण ७९ लाख २१ हजार १८० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिस नाईक प्रमोद ईशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चालकासह मद्यसाठ्याचा मालक, खरेदीदार व पुरवठादार यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक गणेश कुटे तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षकांकडून कौतुक

कारवाई सुरू असताना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे शहर पोलिसांकडून अपडेट्स घेऊन मार्गदर्शन करीत होते. त्यांनी मंगळवारी (ता. ५) सकाळी शहर पोलिस ठाण्यास भेट दिली. या कारवाईबद्दल पोलिसांचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्यासह पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे उपस्थित होते.

निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, संदीप दरवडे, हेमंत खैरनार, गणेश कुटे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, प्रेमसिंह गिरासे, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, प्रमोद ईशी, गोविंद कोळी, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, दीपक खैरनार, विवेकानंद जाधव, भूपेश गांगुर्डे, मोहन सूर्यवंशी, सुशीलकुमार गांगुर्डे, शांतिलाल पावरा, रवींद्र महाले आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT