Police officer with after seizure of illegal liquor stock going to Gujarat.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; 22 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime : गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून २२ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई नवापूर पोलिसांनी केली. (Illegal liquor worth Rs 22 lakh seized nandurbar crime news )

गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारूची चोरटी वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने गुजरातमध्ये अवैधपणे दारूची वाहतूक होणार नाही, तसेच अवैध दारूची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांना गुप्त बातमी मिळाली. नवापूर, गुजरातमधील व्यारा व चलथान येथील काही व्यक्ती एकत्र येऊन चारचाकी वाहना (एमएच २०, ईएल ३१७७)ने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली व दादरा-नगरहवेली आणि दीव-दमण येथे विक्रीसाठी असलेली विदेशी दारू अवैधपणे विक्री करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, चरणमाळ घाट, नवापूरमार्गे गुजरातमध्ये वाहतूक करणार आहेत. त्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी ही माहिती नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना देऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले.

मिळालेल्या बातमीच्या आधारे नवापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने चरणमाळ घाटाच्या पायथ्याशी सापळा रचला. चरणमाळ घाटाकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत रात्री चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ भरधाव येताना दिसली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस पथकातील अंमलदारांनी टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन न थांबविता भरधाव पुढे निघून गेले. पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. चालकाने वाहन नवापूर तालुक्यातील बोरझर फाट्यावर सोडून तीन व्यक्ती काळ्या रंगाच्या वाहनामध्ये बसून तेथून पळून गेल्या. या वाहनाची तपासणी केली असता त्यात दारूसाठा आढळला.

वाहनासह २२ लाख ५७ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. वाहन सोडून पळून गेलेले तीन संशयित आरोपी व काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन जण अशा पाच संशयितांविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यातील पाचही फरारी आरोपींना लवकरच शोधून बेड्या ठोकण्यात येतील व त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT