Fake tadi is widely sold in Akkalkuwa taluk. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : बनावट ताडीची राजरोसपणे विक्री; वाण्याविहीर परिसरात विक्रेत्यांची मुजोरी वाढली

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : अक्कलकुवा तालुक्यातील खापर व कोराईसह वाण्याविहीर परिसरात बनावट ताडीची राजरोसपणे विक्री सुरू असून अनेक व्यसनाधीन तरूण या बनावट ताडीचे बळी पडत आहेत.

एवढे सारे होत असताना विक्रेत्यांची मुजोरी वाढलेली असून, पोलीस प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. (Illegal sale of fake toddy rush of sellers increased in Vanyavehir area Nandurbar Crime News)

या संदर्भात काही दिवसांपूर्वी विविध वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्याने खापर पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली होती. मात्र, काही दिवस उलटताच परिस्थिती जैसे थे झाली आहे. कोराई या गावात ताडीच्या आहारी गेलेले तरूण सुजून फुगून मृत्यूमूखी पडत आहेत.

याबाबत कोराई येथील माजी सरपंचांनी तालुका व जिल्हास्तरावर पत्रव्यवहारदेखिल केला होता. मात्र, त्यावर काहीही कारवाई न झाल्याने अखेर पाणी कुठे मुरत आहे, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी खापर, कोराई व वाण्याविहीर परिसरातील परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध होताच नागरिकांनी वृत्तपत्रांचे कौतुकही केले होते. या ताडीने अनेक तरूणांचे प्राणही घेतल्याचे बोलले जाते.

आजही अनेक तरूण या व्यसनाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट संबंधित प्रशासन पाहत आहे? असा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अवैध व्यवसायांचा अड्डा

अक्कलकुवा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीबहूल आणि सातपूड्याच्या दऱ्याखोऱ्यांत वसलेला, दुर्गम अतिदुर्गम पार्श्‍वभूमी असलेला तालुका आहे. त्यामुळे हा तालुका अवैध व्यवसायांचा अड्डाच बनलेला आहे की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अन्य राज्यांतून आलेल्या लोकांनी तालुक्यात ठिकठिकाणी बनावट ताडीची दुकाने थाटलेली दिसून येतात. विशेष म्हणजे तालुक्यात ताडीची झाडे नसतानाही बनावट ताडी सर्रास विकली जात आहे. कोणताही परवाना नसताना हा प्रकार सुरू असून, खापर परिसरात व गुजरात राज्याच्या हद्दीलगत परप्रांतियांकडून ताडीची विक्री राजरोसपणे सुरू होती.

आरोग्यासाठी घातक

विविध रसायनांपासून तयार केल्या जाणाऱ्या या बनावट ताडीमूळे आरोग्यावर दुरगामी विपरीत परिणाम होतात. वेळप्रसंगी अतिसेवनाने मृत्यूही होत आहेत. यावर परिसरात कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

अन्यथा नाशिक विभागीय पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. विविध घातक रसायनांचा वापर करून अतिशय कमी खर्चात ही ताडी तयार होते. स्वस्तात नशा करायला मिळत असल्याने तरूण व मजूर वर्ग याकडे आकर्षित झाला आहे.

रसायनांमूळे अनेकांचे चेहरे काळे पडले आहेत. तसेच शरीर सुजू लागते. हळूहळू अनेक अवयव निकामी होतात. त्यात प्रामुख्याने किडनीचे विकार व लिव्हरच्या आजारांना व्यक्ती बळी पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT