Immediately register crimes those who attacking the police, shivsena demands 
उत्तर महाराष्ट्र

समाजकंटकांवर गुन्हे दाखल करा!

सकाळ वृत्तसेवा

धुळेः शहरात काल (ता. 29) "बंद'दरम्यान आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांवर हल्ले करून दहशत पसरविणाऱ्या समाजकंटकांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आज शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मागणीसाठी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली.
 
याबाबत निवेदनात म्हटले आहे, की एनआरसी, एनपीआर, सीएए या कायद्यांच्या निषेधार्थ काल बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून काल शहरात जाणीवपूर्वक पोलिसांना टार्गेट करून जनतेत दहशत पसरविण्यात आली. तोडफोड, दगडफेक, करत दुचाकी, चारचाकी वाहने जाळण्याचे प्रकार घडले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज केला तरीही समाजकंटक जुमानत नव्हते. उलट जमावाने पोलिसांवरच चाल केली. ही घटना समाजविघातकच करू शकतात.

जनजीवन प्रभावित करून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना वेळीच ठेचणे आवश्यक आहे. यामुळे पोलिस प्रशासनासह सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान तसेच मानवी हानी प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, यातील खरे सूत्रधार शोधावेत, कोंबिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. 

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, विजय भट्टड, राजेंद्र पाटील, भरत मोरे, किरण जोंधळे, देविदास लोणारी, महादू गवळी, एकनाथ माळी, ललित माळी, संदीप सूर्यवंशी, सुनील चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शनेही करण्यात आली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT