Dashamata Fest latest news esakal
उत्तर महाराष्ट्र

प्रकाशा येथे हजारो भाविकांच्या साक्षीने तापी मध्ये दशामाता मूर्तींचे विसर्जन

सकाळ वृत्तसेवा

प्रकाशा (जि. धुळे) : दशामातेचा जयघोष, ढोल-ताशांचा निनादात बेधुंद नृत्य करत अतिशय हर्षोल्हासात दशामाता मूर्ती विसर्जन मिरवणुका शनिवारी मध्यरात्रीनंतर येथे दाखल झाल्या. अत्यंत भावपूर्ण वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीने प्रकाशा येथील तापी नदीपात्रात हजारो दशामाता मूर्तींच्या विधिवत पूजनाने विसर्जन करण्यात आले. (Immersion of Dashamata idols in tapi witnessed by thousands of devotees at Prakasha Dhule Latest Marathi News)

दर्श अमावस्येला मोठ्या भक्तिभावात प्रकाशा व परिसरात दशामाता मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त महिलांनी दहा दिवस व्रत केले. या महोत्सवात पंचप्रहर आरती, उपवास, भजन कीर्तन, भंडारा, नामस्मरण, जागरण आदी कार्यक्रम केले. शनिवारी रात्री पूजाअर्चा, भंडारा आदी नियोजित पूजन करून प्रकाशासह त्या-त्या गावातून दशामाता मूर्ती विसर्जन मिरवणुका निघाल्या. दक्षिण काशी प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरात मध्यरात्री मिरवणुका पोचल्या.

मध्यरात्री एकनंतर गर्दीचा ओघ वाढला. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ भाविकांची गर्दी झाली. दशामातेचा जयघोष, ढोल-ताशांच्या ठेक्यावर, विविध वेशभूषा करून नृत्य करणारे आबालवृद्ध आपापल्या पथकांसह गर्दीतून मार्ग काढत तापी नदीघाटावर दाखल होत होते. त्यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.

अत्यंत चैतन्यमय वातावरणाने परिसर दुमदुमला होता. येथील तापी नदीघाटावर विधिवत पूजाअर्चा, आरती, प्रसादवाटप करून भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात शेकडो भाविकांच्या साक्षीने हजारो दशामाता मूर्तींचे विसर्जन तापी नदीपात्रात करण्यात आले. सकाळी सहापर्यंत मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

यानिमित्त पूजाअर्चा, साहित्य, चहापान आदींची दुकाने थाटली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. दशामाता मूर्ती विसर्जन मिरवणुकांमुळे केदारेश्वर मंदिर रस्ते भाविकांनी गजबजले होते. सर्व मार्गांवर भाविकांची शेकडो वाहनांची गर्दी झाली होती. मंदिराच्या विश्वस्तांनी भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी रात्रभर येथे उपस्थित होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, उपनिरीक्षक मोरेंसह सुमारे ५० पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख ठेवला. त्यात महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT