सीमा पाटील यांच्या कपाळाला कुंकू, तसेच बांगड्या, मंगळसूत्र, जोडवे घालून, ओटी भरून सन्मान esakal
उत्तर महाराष्ट्र

...अन्‌ सीमा पाटील यांच्या कपाळी पुन्हा कुंकू, मंगळसूत्र!

निखिल सुर्यवंशी

धुळे : शासनाने विधवांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, असे परिपत्रक काढले अन्‌ त्यावर अंमलबजावणीपर कृती धुळ्यात उमटली. यात अंगणवाडीत कार्यरत आणि घरोघरी पोळ्या लाटण्याचे काम करणारी धुळे तालुक्यातील सीमा पाटील यांच्या कपाळाला कुंकू, तसेच बांगड्या, मंगळसूत्र, जोडवे घालून, ओटी भरून सन्मान करण्यात आला. या सन्मानाप्रति गहिवरलेल्या सीमा पाटील यांना आनंद नेमका कसा व्यक्त करावा हे कळेनासे झाले आणि त्या गत आठवणीतही रमल्या..!

मराठा सेवा संघप्रणीत संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेने विधवेच्या सन्मानातून शासनाचे सुयोग्य धोरण अमलात आणणे तुमच्या-आमच्या हाती असल्याचा आदर्शवत संदेश दिला. येथील आधारनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष यामिनी खैरनार, विभागीय अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाध्यक्षा शीतल पाटील, आरोस्तोल पाटील, आशा पाटील, मंगला पाटील, सुशीला पाटील, प्रतिभा पाटील, वंदना सूर्यवंशी, निर्मला वाणी, मंदा मोरे, शैला भामरे, बेबी पवार, दीपिका पाटील, साक्षी देवरे, सोनल भामरे आदी उपस्थित होते.

प्रा. पाटील म्हणाल्या, की शासकीय धोरणात्मक बदलाचा सकारात्मकतेसह आनंदाने स्वीकार व्हावा. बदलाची अंमलबजावणी महिलांचा पुढाकार व कृतीतून व्हावी. पतीच्या निधनानंतर पत्नीचा कपाळावरील कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवे काढून तिची अवहेलना होताना दिसते. तिचा जीवनसाथी, भक्कम आधार गेल्यावर अलंकार काढून होणारे मानसिक खच्चीकरण रोखले पाहिजे. पती गेल्यानंतर ती कुटुंबाचा रहाटगाडा निर्भीडपणे सांभाळते. त्यामुळे अनिष्ट रूढी, प्रथा बंद व्हाव्यात. या विचारातून सीमा पाटील यांचा सन्मान केला. त्यासाठी त्यांची मानसिकता तयार करण्यात आली.

स्थितीला नमविण्याची हिंमत बळावली

गहिवरलेल्या सीमा पाटील म्हणाल्या, की सन्मानाची परतफेड मी कधी करू शकत नाही. पती गेल्यानंतर हिमतीने घर सांभाळत अंगणवाडीत काम करते. इतर काही महिलांकडे पोळ्या लाटण्याचे काम करते आणि नेटाने संसाराचा गाडा हाकते आहे. तरीही पतीची उणीव भासत असते. पतीची सोबत नाही, त्यांच्या आठवणी दाखवायच्या नाहीत हा सामाजिक नियम काही कळाला नाही; परंतु, ही रीत म्हणून जगणे स्वीकारले आहे. त्यात संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेने हुरूप दिल्याने स्थितीला नमविण्याची हिंमत बळावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Blow : संजू सॅमसन चालू सामना सोडून मैदानाबाहेर गेला, CSK ला दुसरा यष्टिरक्षक उभा करावा लागला... फलंदाजीला येणार की नाही?

Pune University Food Safety: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अन्न सुरक्षेचा बोजवारा; कॅन्टीनमधील पोह्यांमध्ये पुन्हा अळी, विद्यार्थ्यांचा संताप

World Record : मुंबई इंडियन्सने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम; IPL फ्रँचायझींमध्येही सर्व आघाड्यांवर टॉपर...

Jaysingpur Killing Case : जयसिंगपुरात भरदिवसा तरुणाचा खून; मित्रानेच केला ‘गेम’, शहरात खळबळ

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात अंबाजोगाईतील भावंडांची सीबीआयकडून गुप्त चौकशी; लातूरमधील मोठ्या रॅकेटचे धागेदोरे

SCROLL FOR NEXT