plastic action esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : खबरदार! प्लॅस्टिकचा साठा केला तर होईल 3 महिन्यांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा

-नंदुरबार पालिकेने दिला कठोर कारवाईचा इशारा

-नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नंदुरबार : प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन तर बिघडतेच परंतु त्याचा मानव व पशूंवर ही अनेक बाबींनी परिणाम होतो. त्यामुळे शासनाने प्लॅस्टिक वापरावर यापूर्वीच बंदी घातली आहे. मात्र तरीही विक्रेत्यांकडून विक्री सुरूच आहे, तर ग्राहकांकडूनही ते बिनधास्त खरेदी करून वापर वाढला आहे. त्यामुळे नंदुरबार पालिकेने आता याबाबत कठोर पावले उचलत हानिकारक व बंदी असलेल्या प्रकारातील प्लॅस्टिकचा साठा आढळून येणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांवर आता कडक कारवाईचा इशारा मुख्याधिकारी अमोल बागूल यांनी दिला आहे. (Imprisonment for 3 months if found stock up on plastic Latest Nandurbar News)

केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने आणि हवामान बदल मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ ला अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टीरीन आणि विस्तारित पॉलिस्टीरीनसह सिंगल यूज प्लॅस्टिकचे उत्पादन आयात, साठवण, वितरण आणि विक्री तसेच वापरावर बंदी घातली आहे. मात्र तरीही अनेक व्यापारी-व्यावसायिक व नागरिकही या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. बंदी असलेल्या एकल प्लॅस्टिकच्या वस्तूंसह प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे.

प्रशासनाने वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला मात्र नवीनच आदेश असल्यामुळे आतापर्यंत नियमांचे पालन करण्याचे व साठा जप्त करणे, समज देणे इथपर्यंतच कारवाया होऊ लागल्या. मात्र वाढते प्रदूषण लक्षात घेता पालिकेचे मुख्याधिकारी बागूल यांनी कडक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी जाहीर आवाहन करीत नियमांचे पालन करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानंतर बंदी असलेल्या प्लॅस्टिकविरुद्ध विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात तळोदा पालिकेनेही याबाबत मोहीम राबवून काही व्यापाऱ्यांकडून प्लॅस्टिकचा साठा जप्त करीत दंडात्मक कारवाई केली आहे. नंदुरबार पालिकेने तीन टप्प्यांत विक्रेत्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

गुन्ह्याचे स्वरूप - दंडाची रक्कम

१) पहिला गुन्हा ः ५,०००

२) दुसरा गुन्हा ः १०,०००

३) तिसरा गुन्हा ः २५,००० व तीन महिने कारावास

याच्यावर आहे बंदी

- प्लॅस्टिकच्या कांड्या, कानकोरणी, फुग्यांसाठीच्या कांड्या, प्लॅस्टिक झेंडे, कॅंडी, कांड्या, आईस्क्रीम कांड्या.

- सजावटीसाठीचे प्लॅस्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल)

-प्लेट्स, कप, ग्लासेस, जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यसाठी स्ट्रॉ स्ट्रे, ढवळण्या, मिठाईचे बॉक्स, आमंत्रणपत्रिका, पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा कमी असलेले)...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT