Dhule: After the electricity supply was cut off in the municipal corporation, an elderly woman and others stuck in the lift were pulled out with the help of journalists and others esakal
उत्तर महाराष्ट्र

Municipal Corporation News : महापालिकेच्या लिफ्टमध्ये ज्येष्ठ महिलेसह तिघे अडकले; यंत्रणेचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेतील लिफ्ट वीजपुरवठा खंडित झाल्याने पुन्हा एकदा बंद पडल्याने एका ज्येष्ठ महिलेसह तिघे त्यात अडकून पडले. तेथे उपस्थित पत्रकारांच्या मदतीने त्यांना कसेबसे बाहेर काढले. महिन्याभरात अशा तीन-चार घटना घडल्या.

दरम्यान, याबाबत महापालिकेतील संबंधित यंत्रणेचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुरुवारी (ता. १८) एक ७० वर्षीय महिला कामानिमित्त महापालिकेत आली होती. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी तिने लिफ्टचा आधार घेतला खरा पण वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्टमध्येच अडकली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महिलेसोबत तीन जण त्यामुळे लिफ्टमध्ये अडकले. दरम्यान, तेथे उपस्थित पत्रकारांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या ज्येष्ठ महिलेसह तिघांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लिफ्टची चावी कर्मचाऱ्याकडून आणली गेली. त्यानंतर त्यांची सुटका झाली. लिफ्ट बंद पडल्यानंतर तेथे जीव गुदमरतो, त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते.

वास्तविक वीजपुरवठा खंडित झाल्यावरही बॅटरी बॅकअपमुळे लिफ्ट बंद पडत नाही. मात्र, महिनाभरात महापालिकेतील लिफ्ट तीन-चारदा अशा पद्धतीने बंद पडून तेथे नागरिक अडकल्याचा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी लिफ्टमध्ये असा अडकला होता.

त्या वेळीही पत्रकारांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले होते. त्यापूर्वीही अशाच घडना घडल्या. महापालिका यंत्रणेचे मात्र या प्रकाराकडे लक्ष नसल्याचे पाहायला मिळत आहे. लिफ्टच्या बॅटरी नादुरुस्त असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अभियंत्यांना विचारले असता, असे काही प्रकार झाल्याची माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT