Liquor seized esakal
उत्तर महाराष्ट्र

चाळीसगाव डेपोच्या बसमधून 4 गोणी दारू हस्तगत

निखिल सुर्यवंशी

धुळे : एसटी महामंडळाच्या बसमध्ये गुरुवारी (ता. ९) चार गोण्या देशी दारू आढळली. हा साठा नेमका कुणाचा आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती आगार व्यवस्थापक स्वाती पाटील यांनी दिली.

चाळीसगाव (जि. जळगाव) आगारातील चाळीसगाव- सुरत बसमधून (एमएच २०, बीएल ३३७५) देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून आगार व्यवस्थापक स्वाती पाटील यांना मिळाली. याबाबत त्यांनी त्यांचे सहकारी आणि बसस्थानकातील पोलिसांना माहिती दिली. बस गुरुवारी दुपारी सव्वाच्या सुमारास धुळे आगारात आल्यानंतर पोलिसांनी बसची तपासणी केली.

प्रवासी आसनांवर कोणताही मुद्देमाल आढळला नाही. मात्र, बसच्या एका कप्प्यात चार गोण्या देशी दारू आढळली. या साठ्याची किंमत अंदाजे ४० हजार आहे. सामान कप्प्यात दारू कशी आली, याबाबत विचारणा झाली असता, चालक सुधीर रामदास चव्हाण (रा. मेहुणबारे) आणि वाहक सुभाष अहिरे (रा. चाळीसगाव) यांनी माहिती नसल्याचे सांगितले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील नीलेश पोतदार, कुंदन पटाईत, वैभव वाडीले, शाकीर शेख, प्रवीण पाटील, मनीष सोनगीरे, किरण भदाणे, तुषार मोरे यांनी बसची तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : राज्याचे आरोग्यमंत्री अमरावतीत दाखल, डफरिन रुग्णालयाची करतायेत पाहणी

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT