police (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 5 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; धुळे जिल्ह्यात अधीक्षक धिवरे यांच्याकडून खांदेपालट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रविवारी (ता. २१) पाच पोलिस निरीक्षक व चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रविवारी (ता. २१) पाच पोलिस निरीक्षक व चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या.

प्रशासकीस कारणावरून बदल्या केल्याचे श्री. धिवरे यांनी आदेशात नमूद केले. जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर पोलिस अधीक्षकांनी बदल्यांबाबत आदेश जारी केला. (In view of upcoming Lok Sabha elections Superintendent of Police Shrikant Dhiware transferred 5 police inspectors within district nandurbar news)

आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शी, लोकाभिमुख पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकामी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना सूचित केले.

त्यानुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक धिवरे यांना दिले. त्यानुसार रविवारी (ता. २१) पाच पोलिस निरीक्षक व चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या.

जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटील यांची देवपूर पोलिस ठाणे, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली.

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांची धुळे शहर पोलिस ठाणे, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांची शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नेमणूक झाली.

शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम आगरकर यांची शिरपूर पोलिस उपविभागीय कार्यालयात नियुक्ती झाली.

पिंपळनेरचे (ता. साक्री) सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी स्थानिक गुन्हे शाखेत, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांची पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नेमणूक झाली.

आझादनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे शिरपूर शहर पोलिस ठाण्याचा तात्पुरता आणि सुरेश शिरसाट यांच्याकडे दोंडाईचा पोलिस ठाण्याचा तात्पुरता प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांना पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदाच्या कार्यभारातून मुक्त करीत त्यांच्याकडे चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात तात्पुरता प्रभारी अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT