GPS-System esakal
उत्तर महाराष्ट्र

वाळूसह खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS बंधनकारक

निखिल सुर्यवंशी

धुळे : अवैध वाळू वाहतुकीला चाप लावण्यासाठी वाळूसह अन्य गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस डिव्हाईस बसवणे बंधनकारक झाले आहे. जिल्ह्यात या प्रणालीची बुधवारपासून (ता. १) अंमलबजावणी सुरू झाली. गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस नसल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला.

राज्यासह जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. या गैरउद्योगास लगाम घालण्यासाठी सरकारने वाळू व अन्य गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा आदेश लागू केला आहे. जिल्ह्यातील सर्व गौण खनिज वाहतूकदारांच्या वाहनांच्या वाहतुकीची भौगोलिक सूचना मिळावी यासाठी जीपीएस डिव्हाईस बसवणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील तापी, बोरी नदीवरील चार वाळूगटांचा लिलाव मार्च २०२२ मध्ये झाला. त्यात चारपैकी एक गट केवळ शासकीय कामासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचा ठेका लघुपाटबंधारे विभागाला दिला आहे. शिरपूर तालुक्यातील दोन्ही वाळूगट एकाच ठेकेदाराकडे आहे. यातून जिल्ह्याच्या महसुलात पाच कोटींची भर पडणे अपेक्षित आहे, असे प्रशासनाने सांगितले. तीन वर्षांपूर्वी केवळ अच्छी व उपरपिंड येथील दोनच गटांचा लिलाव होऊन त्यातून सुमारे दोन कोटींचा महसूल प्रशासनाला प्राप्त झाला होता.

प्रशासनाने पर्यावरण विभागाच्या परवानगीनुसार चार वाळूगटांच्या निविदा मागविल्या. उपरपिंड (ता. शिरपूर) येथील गटासाठी तीन कोटी १८ लाख, तर लोंढरे (ता. शिरपूर) येथील वाळू गटासाठी एक कोटी ५९ लाखांची निविदा मंजूर झाली. दोन्ही निविदा शिरपूर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या आहेत. दातर्ती (ता. साक्री) गटासाठी विलास वाघ यांची २७ लाख ५५ हजारांची निविदा मंजूर झाली. याशिवाय बोरी नदीवरील निमगूळ (ता. शिंदखेडा) येथील गट शासकीय कामासाठी राखीव ठेवला आहे. त्याचा ठेका लघुपाटबंधारे विभागाला १६ लाख नऊ हजारांत दिला आहे. वाळूचे ऑनलाइन लिलाव झाले असतानाही अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी असतात. त्यामुळे सरकारने जीपीएस यंत्रणेव्दारे अवैध वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazil vs Norway : ब्राझील वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर! Erling Haaland चे दोन भन्नाट गोल अन् नॉर्वेकडून १९९८ सालची पुनरावृत्ती...

Erling Haaland चा विक्रम! लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पेला भिडला अन् World Cup इतिहासात असे प्रथमच घडले, ५६ वर्षांत...

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

SCROLL FOR NEXT