Abhinav Goyal speaking at the meeting of department heads at the collector's office. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : आचारसंहितेप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; विशेष कक्षाची स्थापना

Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शनिवारी (ता. १६) जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी व विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले. (Dhule lok sabha election Instructions on Code of Conduct from District Collectors)

नियोजन सभागृहात लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी व विभागप्रमुखांची बैठक झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.

मान्यता देऊ नये

श्री. गोयल म्हणाले, की प्रत्येक नोडल अधिकारी तसेच विभागप्रमुखांनी सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. सर्व विभागांनी चोवीस तासांत शासकीय इमारतीवरील आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून त्यांचा अहवाल सादर करावा. कोणत्याही नवीन कामांची प्रशासकीय मान्यता तसेच कार्यारंभ आदेश, प्रशासकीय मान्यता देण्यात येवू नये.

`त्या` बैठकाही नकोत

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजकीय व्यक्तींसोबत बैठका घेवू नये. तसेच कोणत्याही रॅलीत सहभागी होवू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने तातडीने जमा करावीत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व एसटी बसेसवर लावण्यात आलेला जाहिरात मजकूर तातडीने काढण्यात यावा. (latest marathi news)

नोडल अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहिता पुस्तिकेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी, असे श्री. गोयल यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, की आदर्श आचारसंहितेचे पालन करीत असताना कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेला कळवावे.

निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी सांगितले, की कोणत्याही स्थितीत शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणेचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर होणार नाही याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी.

सी- व्हिजल ॲपचा वापर करावा

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास तक्रार करण्यासाठी नागरिकांनी सी-व्हिजल या मोबाईल ॲपचा वापर करावा. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याप्रसंगाचे ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडिओ काढून तक्रार नोंदविता येईल. या तक्रारींवर आचारसंहिता कक्षामार्फत त्वरीत कार्यवाही करावी, असेही श्री. गोयल यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT