accidant 
उत्तर महाराष्ट्र

अबब.. जळगाव जिल्ह्यात 454 अपघात 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून लक्षात घेता उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी शाम लोही यांनी जिल्ह्यातील अपघातांची संख्या व स्थितीची आज रस्ताशक्ती समितीच्या 
बैठकीत माहिती दिली. यात त्यांनी अपघाताच्या संख्येत जळगाव जिल्हा हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असून माहिती वर्षभरात 454 अपघात झाल्याची सांगितले. दरम्यान ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची 
खंत खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली. 

खासदारांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या रस्ता शक्ती समितीची बैठक खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवनात झाली. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी.एन. पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही उपस्थित होते. बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांनी जिल्ह्यात झालेल्या अपघातांची माहिती दिली. 

दुचाकींचे अपघात सर्वाधिक 
ते म्हणाले की, मागील पाच महिन्यात पारोळा, मेहुणबारे, जळगाव ते धुळे या क्षेत्रात अपघातांचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. गत वर्षात 422 अपघात झाले होते. त्यात आता आठ टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून 
यंदा 454 जीवघेणे अपघात झाले आहेत. यात दुचाकीधारक यांचीच संख्या अधिक आहे. अपघातात राज्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT