relwe ge
relwe ge 
उत्तर महाराष्ट्र

असोदा रेल्वे गेट तूर्त बंद नाही ः  डॉ. ढाकणे 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः असोदा येथील रेल्वेचे गेट एक फेब्रुवारीपासून बंद होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे "दिशा' समितीच्या बैठकीत दिली. 

असोदा येथे रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे रेल्वेगेट एक फेब्रुवारीपासून बंद करण्याबाबत रेल्वेने महापालिकेला पत्र दिले आहे. त्यावर समितीच्या सदस्यांनी सभागृहात याबाबत विचारणा केली. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, वाहतुकीचा कोणताही रस्ता जिल्हा प्रशासनाच्या परवानगी शिवाय बंद केला जात नाही. केला तर संबंधित यंत्रणेवर कारवाई होते. रेल्वे प्रशासनाला त्या मार्गाला पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय एन.ओ.सी. दिली जाणार नाही. 
त्यावर किशोर चौधरी यांनी सांगितले, की गेल्या चार पाच महिन्यापूर्वी रात्री रेल्वेने गेटवर बोर्ड लावला अन्‌ दररोज एवढा वेळ गेट बंद राहील असे अचानक सांगितले. सात गावांचे नागरिक, विद्यार्थी या मार्गावरून जातात. त्यांना जाणे-येणे त्रासाचे होणार आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT