bahinabai mohatsaw 
उत्तर महाराष्ट्र

"पावनखिंड' पोवाड्याने अंगावर उभे केले शहारे 

सकाळ वृत्तसेवा

जळगावः  भरारी फाउंडेशनतर्फे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा  उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी समारोप झाला. लोकरंजनातून समाजप्रबोधन व संगीत यात्रा कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला. परंतु यात शाहीर सम्राट देवानंद माळी यांनी गायलेल्या "पावनखिंड' पोवाड्याने अंगावर शहारे उभे केले. 

भरारी फाउंडेशनतर्फे 16 ते 21 जानेवारीदरम्यान सागर पार्कवर मैदानावर बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पाच दिवसीय महोत्सवाचा समारोप मंगळवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाच दिवसांच्या बहिणाबाई महोत्सवाचा आज सायंकाळी शाहीर सम्राट देवानंद माळी यांच्या "लोकरंजनातून समाजप्रबोधन' व "संगीत यात्रा' या कार्यक्रमानंतर समारोप झाला. शाहीर सम्राट माळी यांनी सादर केलेल्या "पावनखिंड' पोवाड्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. त्याचबरोबर महाराष्ट्राचा पोवाडा व शाहीर चंद्रिका कल्पना माळी यांनी "नारीशक्ती पोवाडा' सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रिया सायखेडे (जळगाव) व यश देवले (ग्वाल्हेर) यांनी "संगीत यात्रा' या कार्यक्रमातून अभंग, नाट्यगीत व बहिणाबाईंचे "धन धरतीच्या कुशी मंधी' हे गीत सादर केले. सुरवातीला महोत्सव यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रमास पोलिस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, नरेश खंडेलवाल, जळगाव जनता सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, डॉ. रूपेश पाटील यांची उपस्थिती होती. रामचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दीपक परदेशी यांनी आभार मानले. 


हजारो नागरिकांची भेट 
दरवर्षी भरविण्यात येणारा बहिणाबाई महोत्सव यंदाही पाच दिवसांचा राहिला. महोत्सवात असलेल्या बचत गटांच्या स्टॉलवरील वस्तू खरेदी आणि रोज सायंकाळी होणाऱ्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंग भरला. या कार्यक्रमांसाठी सायंकाळी जळगावकरांची उपस्थिती लाभत होती. त्यामुळे पाच दिवसांच्या महोत्सवात दहा हजारांवर नागरिकांनी भेट दिल्याचा अंदाज आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT