उत्तर महाराष्ट्र

धक्कादायक.. रस्त्यांचे खोदकाम अन्‌ मनपा प्रशासनच अनभिज्ञ 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : "अमृत' योजनेतंर्गत शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांच्या नरकयातना कमी होत नसताना काही खासगी मोबाईल सेवा कंपन्यांकडून महापालिकेची परवानगी न घेताच केबलसाठी खोदकाम तसेच खांब उभारणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेचे संबंधित विभागातील युनिट अभियंत्यांनाही या प्रकाराचा "वारा' नसल्याने त्या परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 13मध्ये नागेश्‍वर कॉलनीत एका मोबाईल कंपनीकडून केबल टाकण्यासाठी रस्ता खोदला जात होता. स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी हा प्रकार समोर आणला. त्या विभागाचे युनिट अभियंता संजय नेमाडे यांना विचारले असता त्यांना या कामाबाबत कोणतीही माहिती नव्हती. 
तसाच प्रकार आज पुन्हा उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक सहामध्ये आंबेडकर मार्केट परिसरात "महानेट' नामक कंपनीच्या नावाने जाड प्लॅस्टिकचे साधारण 15 फूट उंच पोल मनपाची परवानगी न घेताच रस्त्यांवर उभारले जात असल्याचे समोर आले आहे. ऍड. हाडा यांनी याबाबत माहिती घेतली असता संबंधित कंपनीने 19 डिसेंबरला मनपाला या पोल उभारणीसाठी पत्र दिले होते. मात्र, परवानगी नसताना पोल उभारणी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मनपा प्रशासनाचा सावळा गोंधळ यानिमित्ताने समोर येत असून अभियंता नेमके काय काम करतात? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT