Lakhs of rupees were required to buy a tractor; The married woman took the gallows 
उत्तर महाराष्ट्र

टॅक्‍टर घेण्यासाठी हवे होते लाख रुपये;विवाहितेने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा


जळगाव ; मोहाडी (ता. जळगाव) येथील विवाहितेचा ट्रॅक्‍टर घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत, यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. असहाय्य छळाला कंटाळून आज या विवाहितेने मृत्यूला कवटाळले असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

मोहाडी येथील रहिवासी पूनम घनश्‍याम सोनवणेचा विवाह 2017 मध्ये मोहाडी येथील घनश्‍याम सोनवणे याच्यासोबत झाला होता. मात्र, लग्नात चांगला हुंडा दिला नाही, या कारणावरून तिचा सतत छळ होत होता. तसेच माहेरून ट्रॅक्‍टर घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन यावेत, यासाठी पतीसह सासू, सासरे, नणंद यांनी दोन टप्प्यांत 50,50 हजार आणण्यासाठी तगादा लावला होता, या छळाला कंटाळून तिने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. पूनमचा भाऊ गणेश नन्नवरे याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला पती घनश्‍याम सोनवणे, सासरा राजेंद्र सोनवणे, सासू संगीताबाई सोनवणे, नणंद सरलाबाई सोनवणे आदींविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT