abhishek patil 
उत्तर महाराष्ट्र

आमदार भोळेंचे जनतेवर पुतना मावशीचे प्रेम ः अभिषेक पाटील 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः "न भूतो, न भविष्य' अशी घटना जळगाव येथे घडली आहे. शहराचे आमदार म्हणतात, अधिकाऱ्यांनी माझी आमदारकी संपविण्यासाठी "सुपारी' घेतली. अधिकारी तेही महापालिकेच्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आमदारकी संपविण्याची सुपारी घेणे ही कृती "रेकॉर्ड' म्हणून नोंदवावी अशी आहे. मात्र, जनतेला कायमस्वरूपी मुर्ख बनविता येत नाही, हे आमदार विसरलेले दिसतात. स्वतःच्या नाकर्तेपणाचा ठपका, दोष अधिकाऱ्यांवरून देऊन कर्तव्यातून पळ काढू इच्छितात. त्यांचे जनतेवरचे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे, असा टोला राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी लगावला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयात गुरूवारी आयोजित पत्रकार परिषद ते म्हणाले, की 2014 मध्ये बाबा हरदासराम मंगल कार्यालयात महापालिकेचे गाळे मालकी हक्काने नावावर करून देऊ, असे आश्‍वासन आमदार भोळे यांनी दिले होते. त्यानंतर शहरात त्यांच्यासह भाजपचे तीन आमदार असताना, त्यांच्याच पक्षाचे खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री व राज्य सरकार असताना आजपर्यंत गाळेधारकांची ससेहोलपट संपुष्टात आलेली नाही. तसेच समांतर रस्त्याअभावी शेकडो निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. आमदार भोळे यांच्याच पक्षाचे राज्य सरकार व केंद्र सरकार असताना व त्यांच्याच पक्षाचे खासदार गेल्या अकरा वर्षांपासून असताना समांतर रस्त्याचा प्रश्न सोडविलेला नाही. महापालिकेतील नगररचना विभागात नागरिकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लाखांच्या घरात रक्कम मोजावी लागते. आमदारांच्या पत्नी स्वतः महापौर असताना सर्रास हा प्रकार नगररचना विभागात सुरू होता. रस्त्यावरील अतिक्रमणांना अभय देऊन वर्षानुवर्षे रीतसर व्यवसाय करून पोट भरणाऱ्या कोर्टाच्या भिंतीजवळील पक्की दुकानांवर हातोडा चालविण्यात आला व त्यांना बेरोजगार करण्यात आले. या सर्व मुद्यांवर प्रश्‍न उपस्थित करत ही सुपारी कुठल्या अधिकाऱ्याने घेतली हे आमदार भोळे यांनी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. 

तर गुन्हे दाखल करा... 
आमदार भोळे यांनी केलेल्या कथित आरोपानुसार अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे गैरकृत्यांची सुपारी घेतली असल्यास सदर प्रकार भारतीय दंड विधान कायद्यानुसार गुन्हेगारी कृत्य ठरते. आपल्या बोलण्यात सातत्य असल्यास आमदार भोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करावा किंवा तेवढीही कुवत नसल्यास पुरावे व कागदपत्र आमच्याकडे द्यावे, असे अभिषेक पाटील म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT