rasta rokao imege 
उत्तर महाराष्ट्र

अरे...देवा... आमदरांचाच मागितला राजीनामा ! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जळगाव शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून आता चांगलेच संतापले आहे. त्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना देखील रस्ते दुरुस्तीसाठी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरावे लागत असल्याची शोकांतिका जळगाव शहरात पाहण्यास मिळत आहे. त्यात आज रामानंद नगर परिसरातील संतप्त नागरिकांनी रामानंद नगरचा रस्ता अडवून रस्ता आंदोलन केले. यावेळी पाच वर्षात काय केले..., काम जमत नसेल तर राजीनामा द्या.. अशा तिव्र संतप्त भावना व्यक्त केल्या. 

गेल्या दोन वर्षापासून जळगाव शहरातील 650 किलोमीटर लांबीचे सर्वच रस्ते हे आज खड्डेमय झालेले आहे. त्यामुळे जळगाव शहरातील सुमारे साडेपाच लाख नागरिकांचे या खराब रस्त्यांनी हाडे खिळखिळे केले आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये आमदार सुरेश भोळे तसेच महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात तिव्र असंतोष निर्माण झाला असून आज तो रामानंद नगरच्या रस्त्यावर पाहण्यास मिळाला. सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे, भारती राणे यांच्यासह नागरिकांनी रामानंद नगर रस्त्यावरील रास्ता रोको आंदोलन आज सकाळी साडेअकरा वाजता केले. रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने आमदार सुरेश भोळे तसेच नगरसेवक कैलास सोनवणे आंदोलनास्थळी येवून नागरिकांची समजूत काढत होते. तसेच सात दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्‍वासन यावेळी नागरिकांना दिले. 

मक्तेदारावर कारवाई करा 
अमृत योजने अंतर्गत जलवाहिनीसाठी काव्यरत्नावली ते गिरणाटाकी पर्यंतचा खोदलेले रस्ता मक्तेदाराने गेल्या वर्षभरापासून व्यवस्थित न बुजविलेला नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून पायी चालणे देखील मुश्‍कील होते. पावसाळा गेला तरी मक्तेदार खोदलेला रस्ता चांगला करत नसून त्याच्यावर आधी कारवाई करा अशा तिव्र शब्दात मागणी आमदार व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली. 

जिल्हाधिकारी निवासस्थानापर्यंतच का रस्त्याचे काम 
काव्यरत्नावली चौक ते गिरणाटाकी रस्त्यावर काव्यरत्नावली चौकाच्या काही अंतरावर जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. परंतू तेवढ्याच रस्त्याचे काम केले जात असा प्रश्‍न यावेळी नागरिकांनी आमदार, नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांना उपस्थित केला. बाकीचे लोक माणूस नाही का असा तिव्र शब्दात नागरिकांनी कानउघाडणी यावेळी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम अन् भारताचा मालिका विजय! जसप्रीत, नितीशचे खतरनाक यॉर्कर Video

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

SCROLL FOR NEXT