उत्तर महाराष्ट्र

आधी यथेच्छ दारूची पार्टी...मग चोरी 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : पिलखोड (ता. चाळीसगाव) येथे चोरट्यांनी बंद घराच्या छतावरील खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला. चोरी करण्यापूर्वी त्यांनी घरातच यथेच्छ मद्य प्राशन करून घरातच पार्टी केली. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम 17 हजार रूपये व सोन्या चांदीचे दागिणे असा 74 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. 

पिलखोड येथील नरेंद्र केदारनाथ दंडगव्हाळ हे परिवारासह राहतात (ता. 6 रोजी) दंडगव्हाळ हे परिवारासह त्यांचे काका सुभाष दंडगव्हाळ यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे गेलेले होते. (ता.9) रोजी रात्री 8 वाजता हे कुटुंब पिलखोड येथे परतले. घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता घरात फरशीवर दारूच्या बाट्‌ल्या व ग्लास पडलेले दिसले. दंडगव्हाळ यांनी बेडरूममध्ये जावून पाहीले असता बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दार तोडून लॉकर वाकवून तुटलेल्या अवस्थेत दिसले. भाऊ योगेंद्र याच्या बेडरूमधीलही लोखंडी कपाटाचे दार तोडून 
कपाटातील वस्तु व कपडे अस्तव्यस्त पडलेले दिसले. नरेंद्र दंडगव्हाळ यांच्या बेडरूममधील कपाटातून रोख 10 हजार रूपये व 2 ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजन असलेल्या 4 सोन्याच्या अंगठ्या, भाऊ योगेंद्र यांच्या कपाटातून रोख 7 हजार रूपये व 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 7 ग्रॅम वजनाच्या कानातील दोन रिंग, 3 ग्रॅम वजनाचा व 4 ग्रॅम वजनाचा जोड असा सुमारे 74 हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास झाल्याचे आढळून आले. 

छतावरील खिडकीतून केला प्रवेश 
चोरट्यांनी घराच्या छताच्या सान्याचे लोखंडी गज कापून त्याद्वारे घरात प्रवेश करून दोन्ही कपाटातून किंमती ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नरेंद्र केदारनाथ दंडगव्हाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Pune Crime: पवित्र नात्याला काळीमा! सख्ख्या चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना, आरोपीला अटक..

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT