Robbers Arrested 
उत्तर महाराष्ट्र

तलावाचा केला अड्डा... आणि जंगलात रंगल्या पार्ट्या 

सकाळन्यूजनेटवर्क

जळगाव: बोदवड व मुक्ताईनगर तालुक्‍यात सतत घरफोड्या व लूट करून दरोडेखोरांनी उच्छाद मांडला होता. घरफोड्या व दरोडे टाकून ते उजनीच्या जंगलात मस्त पैकी दारू बोकड्यावर ताव मारत होते. गुप्त माहितीच्या अधारे गुन्हेशाखेने उजनी जंगल पिंजुन काढत दोघांना ताब्यात घेतले व इतर सात संशयीत पसार झाले आहे. 

बोदवड शहरातील जामठी रोडवरील एटिम केबीन मध्ये शिरुन इंडीकॅश कंपनीचे एटिएम उखडून नेण्याचा प्रयत्न 13 जानेवारी रोजी झाला होता. एटिएम मधुन काही भेटले नाही म्हणुन भामट्यांनी शेजारील 
पानटपरी फोडून पानमसाला सिगारेट चोरुन नेल्या होत्या. तसेच बोदवडच्या कृषी मार्केट मधुन शांतीलाल पुखराज जैन यांचे गोदाम फोडून 1 लाख 36 हजारांचा मका चोरुन नेण्यात आला होता. या सर्व गुन्ह्यातील संशयीत टोळी एकच असून त्यांनी बोदवड, मुक्ताईनगर तालूक्‍यात उच्छांद मांडला होता. दाखल 
गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या 
मार्गदर्शनात वरीष्ठ पोलिस निरीक्षक बापु रोहोम यांच्या पथकातील दिपक पाटील याला गुप्त माहिती मिळाली होती. की, तालूक्‍यातील दरोडेखोर उजनीच्या जंगलात वास्तव्यास असल्याची खात्री होवुन पथकातील राजेंद्र पाटील, रविंद्र पाटील, अनील जाधव, सुधाकर अंभोरे, दिपक पाटिल अश्रफ शेख, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, दादाभाऊ पाटिल, अशोक पाटिल, विजय पटिल नरेंद्र वारुळे आदींनी संपुर्ण जंगल पिंजून काढल्यावर तलावाकाठी भुरा बाळू गायकवाड(वय-25,रा.भिलाटी बोदवड), आनंद गुलाब धुळकर (वय-25,रा.भिलाटी )अशा दोन संशयीतांना अटक करण्यात आली असून इतर भामटे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. 


तलावाची मच्छी अन्‌ दारु 
उजनी दर्ग्याच्या पाठीमागील तलावावर या दरोडेखोरांनी अड्डा बनवला होता. तलावाची ताजी मच्छी, 
चोरीचा बोकड्या आणि रोजच दारुच्या पार्ट्या चालत असल्याची टिप दिपक पाटिल याला मिळाल्यावरुन संशयीतांना अटकेचा सापळा रचण्यात आला. मात्र, अंधाराचा फायदा घेत इतर भामटे पळून जाण्यात यशस्वी ठरले 

शेड्यांने बनवली टोळी 
दरोडेखोरच्या टोळीत गोविंदा गायकवाड आणि शेंड्या यांनी तब्बल नऊ लोकांची टोळी गोळा करुन 
सर्वात आधी नोहेंबर महिन्यात बोदवडची फायनान्स बॅंक फोडून साडेबारा लाखांची रोकड लांबवली होती. दोन संशयीत अटक होवून त्यांनतर जामीनावर बाहेर आल्यावर टोळी स्थापन करुन गावातील एक ट्रॅक्‍टर घेत 13 जानेवारीला इंडीकॅश बॅंकेचे जामठी येथील एटिएम चक्क खोदुन उघडून नेत असतांना परिसरातील 
रहिवाश्‍याला जाग आल्याने त्यांना पळून जावे लागले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT