कंडारीतील गृहस्थाचा दगडाने ठेचून खून 
उत्तर महाराष्ट्र

कंडारीतील गृहस्थाचा दगडाने ठेचून खून ;रात्री सोबत मद्यप्राशन करणारा मित्र ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव, :- जळगाव तालुक्‍यातील कंडारी येथील 40 वर्षीय गृहस्थाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. तुषार प्रभाकर सुर्वे(वय-41) असे मयताचे नाव असून गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यात रक्ताच्या थारोळ्यात तुषारचा मृतदेह दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. नशिराबाद पोलिसांसह गुन्हेशाखेने धाव घेतली असून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 

कंडारी (ता.जळगाव) येथील तुषार ऊर्फ अप्पा प्रभाकर सुर्वे (वय-41 रा. कंडारी) आणि रायपूर येथील उपसरपंच वसंत सीताराम धनगर दोघांनी खळ्यात बुधवारी रात्री मद्यप्राशन केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तुषार खळ्यात रखवालीसाठी झोपला होता तर वसंत धनगर यांचे वाघुर धरणाजवळ घर आहे. रात्री साडे आठ वाजेपर्यंतच आपण सोबत होतो, असे त्यांनी प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले आहे. नेरी-गाढेगाव रस्त्यावर तुषार यांचे शेत व खळे आहे. त्यानंतर सकाळी तुषारचा मृतदेहच आढळून आला. तुषार हा खळ्यात पलंगावर मृतावस्थेत पडलेल्या असल्याची माहिती प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांनी कुटुंबाला कळविली. 

घटनास्थळी पोलिसांची धाव 
घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारुळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

गुन्हा दाखल 
मृताची पत्नी मनीषा यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार याच्या पश्‍चात पत्नी मनीषा, मुलगा ओम, वडील प्रभाकर भाऊराव सुर्वे, भाऊ हेमंत असा परिवार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT