उत्तर महाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव देशात ७५ व्या क्रमांकावर

सकाळवृत्तसेवा

जळगाव - स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात देशभरातल्या ४ हजार ४१ शहरांमध्ये जळगाव शहराचा समावेश आहे. या स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी ‘स्वच्छता ॲप’ तयार करण्यात आले आहे. या ‘ॲप’वरील तक्रारींचे निराकरण व वापरानुसार देशात जळगाव शहर ७५ व्या क्रमांक आहे. स्वच्छता सर्वेक्षणाबाबत बुधवारी नगरसचिव विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. यात शहरातील स्वच्छतेच्या उपाययोजनांची माहिती घेतली, असे अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी सांगितले. 

केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन ही मोहीम राबविली जात आहे. त्यात देशातील ४ हजार ४१ शहराचा सहभाग आहे. त्यात महाराष्ट्रातील अमृत योजनेतील असलेल्या जळगाव शहराचा देखील सहभाग आहे. २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात महापालिकेचा यापूर्वी ३७३ वा क्रमांक आला होता. आता स्वच्छ सर्वेक्षणात जळगावचा ७५ क्रमांक आहे. त्यात शासनाने स्वच्छता मोबाईल ॲप तयार केले असून हे ॲप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जळगाव शहराला १० हजारांचे लक्ष्य दिले असून आतापर्यंत १ हजार ७०० जणांनी हे ‘ॲप’ डाऊनलोड केले आहे, अशी माहिती कानडे यांनी दिली.  

स्वच्छता उपाययोजनांची दिली माहिती
प्रधान सचिव म्हैसकर यांनी घेतल्या बैठकीत प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी जळगाव शहरातील स्वच्छता उपाययोजनांची माहिती दिली. यात शहरातील शून्य कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वेगळा करणे, मंगल कार्यालयांना घंटागाडीमध्ये कचरा टाकणे, उघड्यावर अन्न पदार्थ टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येकाला घंटागाडीचा वापर करणे बंधनकारक, नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पाच स्वच्छता दूत नेमल्याची,   तसेच यासाठी शहरातील ४० हजार नागरिकांच्या ॲड्रॉइड मोबाइलच्या व्हॉट्‌सॲपवर स्वच्छता मोबाईल ॲपची लिंक टाकली जाणार आहे.
 

‘मोबाईल ॲप’ने तक्रारींचा निपटारा
जळगाव शहरासाठी मोबाईल स्वच्छ सर्वेक्षण जळगाव ‘ॲप’ हे नागरिकांनी डाऊनलोड करायचे आहे. त्या ॲपद्वारे परिसरातील अस्वच्छतेच्या तक्रारी, फोटो टाकून त्या त्वरित महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोडविल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड केल्यास स्वच्छ सर्वेक्षणात जळगावच्या रॅकिंगला मदत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

जानेवारीत स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक
स्वच्छ सर्वेक्षणाचे देशभरात सुरू असून, केंद्र सरकारचे पथक शहरात चार जानेवारीनंतर येणार आहे. तर महापालिका प्रशासनाकडून घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत मोफत करून देण्याचा एका एजन्सीचा  प्रस्ताव आला असून तो महासभेपुढे मांडला जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती समोर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT