उत्तर महाराष्ट्र

डीवायएसपी पदासाठी विजय चौधरींचे आजपासून प्रशिक्षण

शिवनंदन बाविस्कर

पिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) - ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींची 3 मेच्या शासन निर्णयानूसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'डीवायएसपी' पदावर नियुक्त करण्यासंदर्भात नियुक्तीपत्र दिले होते. त्यानुसार आजपासून पुणे येथे त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे.

विजय यांची 'डीवायएसपी' पदासाठी अकरा महिने प्रशिक्षण प्रक्रिया चालणार आहे. त्यानुसार आज 1 ऑगस्टपासून पुण्याच्या यशदा येथे प्रशिक्षणाला प्रारंभ होत आहे. पुण्यात पहिला एक महिना प्रशिक्षण पार पडेल. त्यानंतर सप्टेंबरपासून नाशिक येथे दहा महिने प्रशिक्षण चालणार आहे. परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमा संदर्भात विजय यांना शासनातर्फे माहितीचे पत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे ते आजपासून प्रशिक्षणासाठी रुजु होणार असल्याचे स्वतः विजय यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

दरम्यान प्रशिक्षणांतर्गत तालिम करता येईल का? यासंदर्भात जाणुन घेतले असता विजय म्हणाले की, प्रशिक्षणा दरम्यान तालमीसाठी वेळ मिळेल का ते माहित नाही. पण मी अधिकार्यांशी विनंती करुन किंवा प्रशिक्षणानंतर मिळालेल्या वेळात तालीम करीत जाईल असे सांगितले. तालमीत खंड न पडू देण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल असेही विजय यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: मतदार सहलीवर अन् नेते फिल्डवर; जिल्हा बँकेतील विजयासाठी उमेदवारांसह नेत्यांचीही जोरदार फिल्डिंग, शिवसेनेने मिळवला पाठिंबा

Bank Election: सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

कॉलेजियमच्या निर्णयांवरून माजी न्यायमूर्ती आमनेसामने; जस्टीस कौल यांच्या आरोपाला चंद्रचूड यांनी दिलं प्रत्युत्तर, काय म्हणाले?

Maharashtra Live News : मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा टोलनाका येथे जोरदार राडा

Manoj Jarange,:ध्वनिफीत प्रकरणातील सत्य समाजासमोर आणणार; मनोज जरांगे यांचा निर्धार

SCROLL FOR NEXT