जळगाव - फुले मार्केटमध्ये गुरुवारी विक्रेते व महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईप्रसंगी झालेली हाणामारी. 
उत्तर महाराष्ट्र

अतिक्रमण निर्मूलन पथक-विक्रेत्यांमध्ये धुमश्‍चक्री

सकाळवृत्तसेवा

जळगाव - शहरातील फुले मार्केटमध्ये फुटपाथवर ‘नो हॉकर्स’ झोन असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. यात महापालिका कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये हाणामारी झाली, तर धावपळीत एक विक्रेता पडल्याने जखमी झाला. यावेळी महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या विक्रेत्याला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेबाबत शहर पोलिस ठाण्यात महापालिकेने तक्रार दिली आहे.   

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरात ‘नो हॉकर्स झोन’ ठिकाणांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आज फुले मार्केटमध्ये दुपारी एकच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता गेट क्रमांक दोनजवळील फुटपाथवरील विक्रेत्यांवर कारवाईला सुरवात केली. यावेळी कर्मचारी सामान जप्त करत असताना विक्रेता व कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. 

मारहाणीत दोघे जखमी
महापालिका कर्मचारी शांताराम सपकाळे यांना विक्रेता सचिन महाजन यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करायला सुरवात केली. यात सपकाळे जखमी झाले. हा वाद बघून महापालिकेचे सर्व कर्मचारी धावून गेले. या झटापटीत सचिनचा भाऊ चंद्रकांत महाजनचे डोके फुटून तो जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तर एका विक्रेत्याला पकडून महापालिका कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात नेले. तर शासकीय कामात व्यत्यय आणल्याबद्दल विक्रेत्या महाजन याच्याविरुद्ध अदाखलपात्र तक्रार महापालिकेने दिली आहे.  

मनपा कर्मचाऱ्यांनी केली मारहाण
अतिक्रमण निर्मूलन कारवाईप्रसंगी झालेल्या झटापटीत विक्रेता चंद्रकांत महाजन याचे डोके फुटून जखमी झाला. त्याला त्वरीत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महापालिका कर्मचाऱ्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप चंद्रकांतने केला आहे. तर झालेल्या धावपळीत विक्रेता पडल्याने जखमी झाला असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

गाडी येताच पळापळ
फुले मार्केटमध्ये दररोज अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वाहन येताच फुटपाथवर बसलेले विक्रेते गायब होतात. वाहन येण्याच्या आधी या विक्रेत्यांना सुगावा लागत असल्याने विक्रेते आपला सामान लपवून गायब होतात. गाडी गेली की पुन्हा विक्रेते येत असल्याचे चित्र दिसत असते.

दुकानाबाहेर विक्रीसाठी देतात जागा  
फुले मार्केटमधील गाळेमालक दुकानासमोरील फुटपाथवर या व्यवसाय विक्री करणाऱ्यांना भाड्याने जागा देत असल्याची माहिती समोर येत आहे. ही जागा ग्राहकांना व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी असताना गाळेधारक केवळ त्यांच्या दुकानाबाहेर या विक्रेत्यांना बसण्याची परवानगी देऊन पैसे कमवीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा विक्रेत्यांचे अतिक्रमण या फुटपाथवर होऊ लागलेले आहे.

शहर पोलिस ठाण्यात गर्दी
शहर पोलिस ठाण्यात अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या विक्रेत्याला पकडून जमा केले. यावेळी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात गर्दी करून प्रकरण बाहेर मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच अतिक्रमण निर्मूलन विभाग अधीक्षक एच. एम. खान यांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT