file photo
file photo 
उत्तर महाराष्ट्र

दीडशे जणांच्या पथकाला झुंजवतोय एकटा बिबट्या

दीपक कच्छवा

वनविभागाच्या निष्क्रीयेतेवर गावागावातून संताप; ग्रामस्थांचे हवे सहकार्य

मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव): नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सध्या या भागात वन विभागाचे जवळपास 150 जणांचे पथक तैनात आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करूनही बिबट्या हाती लागत नसल्याने गावागावातून वनविभागाच्या निष्क्रीयेतेवर संताप व्यक्‍त होत आहे. वरखेडेसह, उपखेड, वरखेडे खुर्द तसेच साकूर गावात नरभक्षक बिबट्याने मानवी हल्ले करून आतापर्यंत तब्बल सात जणांचा बळी घेतला आहे. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी अकरा दिवसांपासून वरखेडे येथील आश्रमशाळेत थांबलेले 150 कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्‍न आता ग्रामस्थांमधून व्यक्‍त होत आहे.

शासनाकडे सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना, एका बिबट्याचा बंदोबस्त करता येत नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर होत आहे. तज्ज्ञ अभ्यासकांसह निष्णात असे "शार्प शूटर'ही सध्या आले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकी दहा जणांचे एक या प्रमाणे दहा पथकही वेगवेगळ्या भागात गस्त घालत आहेत. सर्व जण याच ठिकाणी तळ ठोकून असले तरीही बिबट्या हाती लागत नसल्याने यंत्रणाही काहीशी हतबल होताना दिसत आहे.

आश्रमशाळेवर चालतो भटारखाना
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आलेला 150 जणांचा लवाजमा उदेसिंगअण्णा पवार सर्वोदय आश्रमशाळेवर उतरला आहे. वन विभागाने स्वयंपाकासाठी स्वतंत्र आचारी ठेवून दररोज जेवणाची व्यवस्था केली आहे. आज अकरा दिवसांपासून सर्व अत्याधुनिक साहित्यानिशी असलेल्या लवाजमाला एकटा बिबट्या हैराण करीत आहे. बिबट्यावावरत असलेल्या परिसरात पिंजरे ठेवण्यात आले आहेत. पिंजऱ्याच्या आजूबाजूला दहा लिटर बोकडाचे रक्तही टाकण्यात आले आहे. या ठिकाणी बोकडाच्या रक्‍ताच्या वासाने बिबट्या येतो, असा विश्‍वास वन विभागाला असल्याने ही शक्कल लढविण्यात आली आहे. परंतु, फारसा उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे.

बिबट्या आला होता पण...
उपखेड परिसरात महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर वन विभागाने आपल्या कार्यवाहीत वाढ केली आहे. खास हैदराबाद येथून नामवंत शूटर नवाब शहापत अली खान व दिल्ली येथून प्राणी बचाव संघटनेचे सदस्य वाशीम अहमद यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या रेंजमध्ये बिबट्या आला होता. मात्र, या ठिकाणी ग्रामस्थांच्या हुल्लडबाजीमुळे बिबट्या तेथून पसार झाला. बिबट्या दिसला किंवा ज्या ठिकाणी तो दडून बसला आहे, त्या जागेच्या परिसरात ग्रामस्थांनी गर्दी करू नये. तसेच या माहितीची चर्चा न करता वन विभागाला कळवावे, जेणे करून बिबट्याला ठार करणे किंवा जेरबंद करणे सोईचे होईल. याकामी स्थानिक ग्रामस्थांनी मदत करावी, अशी अपेक्षा तहसीलदार कैलास देवरे यांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांमध्ये जनजागृती
बिबट्याकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्‍यता नाकारत येत नसल्यामुळे प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते भिवसन जगताप आदींनी या भागातील वाड्या वस्त्यांवर जाऊन बाहेर झोपलेल्यांना घरात झोपा असे सांगून सर्वांना योग्य त्या सूचना केल्या. गावागावांमध्ये दवंडी देऊन ग्रामस्थांनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी जनजागृती केली जात आहे.

हैदराबाद येथील नवाबांना धक्काबुक्की
साकूर (ता. मालेगाव) येथे आठ वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना समजताच हैदराबाद येथून शूटर नवाब शहापतअली खान हे एरंडोलचे वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार यांच्यासोबत आले. ते ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन करीत असताना संतप्त ग्रामस्थांनी शूटर नवाब अली खान व धनंजय पवार यांना धक्काबुक्की केली. यात धनंजय पवार यांच्या खांद्याला दुखापतही झाली, अशी माहिती वन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT