उत्तर महाराष्ट्र

अखेर जलवाहिनी दुरुस्ती सुरू

सकाळवृत्तसेवा

जळगाव - रेमंड चौफुलीजवळ एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील ‘वाघूर’च्या मुख्य जलवाहिनीस महिनाभरापासून गळती लागली होती. महापालिकेने गळती शोधून काढली; परंतु गळती दुरुस्तीचे काम केले जात नसल्याने रोज लाखो लिटर पाणी वाया जात होते. याबाबत आजूबाजूच्या कंपन्यांसह एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी महापौरांकडे तक्रार केल्यानंतर आज जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीच्या कामाला आज सायंकाळी उशिरा सुरवात करण्यात आली. त्यामुळे उद्या (३ ऑगस्ट) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

गेल्या महिनाभरापासून रेमंड चौफुलीजवळील एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर ‘वाघूर’च्या १५ मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गळती दुरुस्तीचे काम करण्यास चालढकल चालविली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी महापौर नितीन लढ्ढा यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत ‘सकाळ’ने ‘रेमंड चौफुलीजवळ पाण्याची नासाडी सुरूच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवाय, आजूबाजूच्या कंपन्यांसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाणी जमा होऊन त्रास सहन करावा लागत होता. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत आज महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सायंकाळी सहानंतर गळती दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली. दुरुस्तीला ३० तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्या (३ ऑगस्ट) पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. नियोजित पाण्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले असून, उद्याचा पाणीपुरवठा ४ ऑगस्टला होईल. ४ ऑगस्टचा ५ ला, ५ ऑगस्टचा ६ ला पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील भोळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT