उत्तर महाराष्ट्र

"व्हीआयपी' क्रमांकांची हौस "लाख मोलाची'! 

अमोल भट

जळगाव : हौसेला मोल नसतं.. मग ती हौस वाहन खरेदीची असो की, त्या वाहनासाठी आपल्याला हवा तो क्रमांक घेण्याची.. आणि पसंती, श्रद्धा व भक्तीनुसार क्रमांक घेत हीच हौस पूर्ण करण्यासाठी वाहनधारक अगदी लाखो रुपयेही मोजायला तयार होऊ लागलेत... सध्या तर अशाप्रकारचे "व्हीआयपी' क्रमांक घेण्याची स्पर्धाच सुरू असून, त्यातून परिवहन विभागाचीही कोटींची कमाई होत आहे. 

वाहनांच्या नोंदणीद्वारे क्रमांक मिळवून त्यातून भाऊ, दादा, अण्णा, काका, अशा अक्षरांची जुळवाजुळव करण्यासाठी म्हणून वाहनाच्या "चॉईस नंबर'ला भाव आलेला आहे. नंबरची क्रेझ लक्षात घेऊन शासनाने त्यातून महसूलवाढीची शक्कल लढविली आहे. 

छंद आणि श्रद्धेचा विषय 
वाहनांची नोंदणी झाल्यांनतर क्रमांक मिळणारच आहे, मात्र अनेकांना शुभ आकड्यांची गणिते जुळवून क्रमांक घेणे शुभ ठरवले जाते. चार आकड्यांची बेरीज करून शुभ आकडा काढला जातो. अनेक जण लकी क्रमांक म्हणून नंबर "चॉईस' करून घेतात. अनेक जण छंद म्हणून सम आकड्यांचे नंबर निवडतात. काही जण आकड्यांतून शब्द तयार करतात तर काहींकडून क्रमांकामधून आपल्या श्रद्धास्थानांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. 

काय आहे धोका? 
भाऊ, दादा, नाना, काका अशा विविध पद्धतीने क्रमांकांची जुळवाजुळव करून अक्षरे तयार केलेली नंबरप्लेट अनधिकृत आहे. अशा वाहनाकडून अपघात झाल्यास त्याला शोधणे अवघड होते, ही सामाजिक हानीच आहे. 

"जंपिंग' नंबरसाठीही शुल्क 
कुठल्याही 1000 नंबरच्या पुढील जंपिंग नंबरसाठी चारचाकीला 7 हजार 500, तर दुचाकीला चार हजार रुपये आणि 1000 च्या आतील जंपिंग नंबरसाठी चारचाकीला पाच हजार व दुचाकीला तीन हजार रुपये मोजावे लागतात. याव्यतिरिक्त वाहनधारकाच्या स्वतःच्या पसंती क्रमांकासाठी वरील आकर्षक क्रमांक सोडून चारचाकी करिता सुरू क्रमांकपासून ते एक हजारापर्यंत पाच हजार रुपये व त्यापुढील क्रमांकासाठी सात हजार पाचशे रुपये तसेच दुचाकीसाठी त्यावेळी सुरू सिरीजमधील क्रमांकापासून 1000 या क्रमांकापर्यंत "जम्पिंग' पसंती शुल्क तीन हजार व त्या पुढील क्रमांकासाठी चार हजार रुपये अदा करावे लागतात. 

कसे आहेत काही महागडे क्रमांक 
परिवहन विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे 1 या क्रमांकाला चार चाकीसाठी चक्क 3 लाख, तर दुचाकीसाठी 50 हजार रुपये मोजावे लागतात. 9, 99, 786, 999 या क्रमांकांसाठी चारचाकीला दीड लाख, दुचाकीला 20 हजार रुपये मोजावे लागतात. त्याखालोखाल 11, 222, 333, 444, 555, 666, 777, 888, 1111, 2222, 3333, 4444, 5555, 6666, 7777, 8888 या क्रमांकांसाठी चारचाकीला 70 हजार तर दुचाकीला 15 हजार रुपये मोजावे लागतात. त्याचप्रमाणे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 100, 123, 234, 345, 456, 567, 678, 789, 900, 1000, 1001, 1234, 1525, 1818, 2345, 2525, 2727, 3456, 3636, 4567, 5000, 5454, 5678, 6363, 6789, 7007, 7272, 8181, 9000, 9009, 9090 या क्रमांकांसाठी चारचाकीला 50 हजार, तर दुचाकीसाठी 10 हजार रुपये लागतात, याशिवाय अन्य 250 आकर्षक क्रमांकांना चारचाकीसाठी पंधरा हजार व दुचाकीसाठी पाच हजार रुपये मोजावे लागतात. 

पसंती क्रमांकासाठीचे आर्थिक वर्षातील उत्पन्न : (जळगाव जिल्हा) 
सन 2018-19 : 2 कोटी 34 लाख 83 हजार 
1 एप्रिल 2019 ते आजपर्यंत : 1 कोटी 58 लाख 63 हजार पाचशे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT