A teacher carrying textbooks to a group resource center esakal
उत्तर महाराष्ट्र

School First Day : नवीन शैक्षणिक वर्षाची उत्सुकता शिगेला; नवागतांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम

School First Day : विद्यार्थ्यांची यादी तयार करून नवागतांचे स्वागत अशा विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये साजरा होणार आहे.

फुंदीलाल माळी

School First Day : शाळेतील सर्व मुलींच्या पालकांचे स्वागत, बालकांची गावातून वाजतगाजत मिरवणूक, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून नवागतांचे स्वागत अशा विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रवेशोत्सव यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये साजरा होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याचा उत्साह तालुक्यात संचारला असून, विद्यार्थीदेखील शाळा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. (excitement of new academic year has begun in taloda )

त्यामुळे तळोदा तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीची उत्सुकता लागली आहे. त्यात नवीन वर्षात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांच्या सक्रिय सहभाग घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३७ शाळा आहेत. या शाळांमधून दहा हजार ३१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यात एकूण २८ माध्यमिक शाळा व नऊ आश्रमशाळा आहेत.

यात जिल्हा परिषद शाळांमध्ये ४११ शिक्षकपदे मंजूर आहेत. मात्र कार्यरत शिक्षकांची संख्या ३८४ आहे. त्यामुळे शिक्षकांची २७ पदे रिक्त आहेत. त्यात नुकतीच १० शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांमधून ही बदली झालेली पदे भरण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय शिक्षकांची पदे मात्र मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. (latest marathi news)

त्यासाठी तालुक्यात १०० टक्के पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, ९१ हजार ९९ पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोच करण्यात आलेली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे तालुक्यातील बहुतांश शाळांच्या इमारती सुस्थितीत आहेत. मात्र जूनच्या सुरवातीला आलेल्या वादळात तालुक्यातील तीन शाळांचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली होती.

त्यात सर्वाधिक नुकसान तळोदा शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक सहाचे झाले आहे. या शाळेच्या इमारतीचे सर्व पत्रे उडून गेले असून, तातडीने शाळा दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात तालुका शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हास्तरावर सादर केला आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्तीसाठी निधी मंजूर व्हावा, अशी अपेक्षा आहे.

३२ विषय शिक्षकांची पदे मंजूर असताना केवळ १२ पदे कार्यरत आहेत. त्यामुळे सातवीपर्यंत वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळांना विषय शिक्षक मिळण्याची प्रतीक्षाच आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विषय शिक्षकांची पदे भरण्याची अपेक्षा आहे.दुसरीकडे मोफत पाठ्यपुस्तक योजनेत तालुक्यातील पात्र शाळांची संख्या १७५ असून, त्यातील २२ हजार ७०२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जाणार आहे.

''पहिल्या दिवशी नवागतांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शिक्षकांनाही आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शैक्षणिक साहित्याचा वापर, सहकारी विद्यार्थ्यांकडून अध्ययन, गट अध्ययन, विषय मित्र, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छ्ता या बाबीवर लक्ष केंद्रित करून गुणवत्ता विकास कार्यक्रमाला गती देण्याचे नियोजन आहे. पालकांची सभा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माहितीची देवाणघेवाण वाढविणे तसेच पालक सहभागातून गुणवत्ता विकास हेच आमचे नवीन शैक्षणिक वर्षात ध्येय राहणार आहे.''-शेखर धनगर, गटशिक्षणाधिकारी, तळोदा

तळोदा तालुक्यातील शाळांची स्थिती

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा- १३७

माध्यमिक शाळा- २८

आश्रमशाळा- ९

जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थिसंख्या- १०,३१०

मोफत पाठ्यपुस्तके लाभार्थिसंख्या- २२,७०२

तालुक्यात एकूण प्राप्त पाठ्यपुस्तके- ९१,०९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बप्पा तुम्ही भाग्यवान.. कापनीच्या वेळी आलात'' पंकजा मुंडेंकडून बजरंग सोनवणेंना चिमटा

Modi-Shivraj Singh Chouhan : मोदींना पहिल्यांदा कधी भेटले होते शिवराज सिंह चौहान? जाणून घ्या, 'ती' खास आठवण!

Digital Panvel: ‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल! महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर

Budhwar Peth Pune: तरुण बुधवारपेठेत गेला पण पैसे देताना पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, तीन महिलांनी असं काही केलं की....

10-20 करोड नाही तर सिडनी स्वीनीला बॉलिवूड फिल्मसाठी ऑफर केले इतके रुपये, ती सुद्धा झाली SHOCK !

SCROLL FOR NEXT