jalgaon tahsil firsrtok 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव तहसीलचे रेकॉर्ड आगीच्या भक्ष्यस्थानी

सकाळ वृत्तसेवा


रेकॉर्डरुमची बंद खोली जळून खाक 
सकाळ वृत्तसेवा 
जळगाव :- शहरात मध्यवर्ती बळीराम पेठेतील तहसील कार्यालयास रात्री आग लागल्याची घटना घडली. कार्यालयातील मागील बाजुस निवडणूक आणि पुरवठा विभागाच्या रेकॉर्डरुमला लागलेल्या आगीत महत्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, शॉटसर्कीट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज तहसीदार वैशाली हिंगे यांनी व्यक्त केला आहे. 

बळीरामपेठ भागातील हेरिटेज दर्जा प्राप्त तहसील कार्यालयाच्या इमारतीत मागील बाजुस निवडणुक आणि पुरवठा शाखेत रात्री 11 वाजेपुर्वी भिषण आग लागली. आगीचे लोट आकाशात उठू लागल्यावर जिल्हापरीषद कार्यालयातील वॉचमनद्वारे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कळवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसींग रावळ यांनी कळवल्यानंतर तहसीलदार वैशाली हिंगे, प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पुर्वी शहर पोलिस ठाण्याचे अमलदार विजय निकुंभ, रतन गिते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण केले होते. दोन अग्नि बंबाच्या साहाय्याने पाऊण तासात आगिवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले. 

विद्युत तारांचे जाळे 
तहसील कार्यालयाच्या दगडी बांधकामातील इमारतीत सर्वदुर डोक्‍यावर विद्युत तारांचे जाळे पसरलेले असून आग लागली त्या खोल्यांच्या बाहेरही तशीच परिस्थीती असून या तारांमध्ये शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तहसील कार्यालातील तारांच्या भेंडोळ्यासाठी वारंवार एमएसईबीला कळवण्यात आल्याचेही येथील कर्मचाऱ्यांनी माहिती देतांना सांगीतले. 

- शाटसर्किटची शक्‍यता 
तहसील कार्यालयातील विद्युतपुरवठा करणाऱ्या तारांमध्ये शॉटसर्किट होवुन आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असुन निवडणुक आणि पुरवठा विभागाशी संबधीत कागदपत्रे या खोल्यांमध्ये होते. नेमके काय नुकसान झाले आहे हे आताच सांगता येणे शक्‍य नसून सकाळी पहाणी केल्यावर झालेल्या नुकसानी बाबत स्पष्टता होईल. 
- वैशाली हिंगे 
तहसीलदार जळगाव, 

 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है..'', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; पक्षात येणाऱ्यांबद्दल थेटच बोलले

Uddhav Thackeray: शिवसेना काँग्रेससोबत विलीन होणार का? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देत विषयच संपवला!

''मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण... ''; उद्धव ठाकरेंनी घातली मोठी अट, काय म्हणाले?

Virar News : देश-विदेशात वसईच्या सुकेळींचे नाव पोहोचविणारे पायस रॉड्रिक्स पडद्या आड

Pune News : भाजप नगरसेवकांच्या वर्तनावर महापौरांची नाराजी; दालनात बोलावून दिली समज

SCROLL FOR NEXT