Queue for voting at Mahajan High School for Teachers Constituency. esakal
उत्तर महाराष्ट्र

Teacher Constituency Election : धुळे जिल्ह्यातून सरासरी 93.77 टक्के मतदान

Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात बुधवारी (ता.२६) मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

Teacher Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात बुधवारी (ता.२६) मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली. जिल्ह्यात एकूण ८ हजार १५९ मतदारांपैकी ७ हजार ६५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण ९३.७७ टक्के आहे. जिल्ह्यात सहा हजार २०३ पुरुष, तर एक हजार ९५६, असे एकूण ८ हजार १५९ मतदार होते. पैकी ५ हजार ८४१ पुरुष, तर १ हजार ८१० महिला, असे एकूण ७ हजार ६५१ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (Election Average voting from Dhule district is 93 percent )

यात पुरुष मतदारांचे प्रमाण ९४ टक्के, महिला मतदारांचे प्रमाण ९३ टक्के आहे. धुळे शहरातील मतदान केंद्रात मतदारांची सकाळपासून गर्दी होती. उत्साही वातावरणात मतदान झाले. महाजन हायस्कूल केंद्रात दुपारी एकपर्यंत सरासरी ४७ टक्के मतदान झाले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी मतदान केंद्राची पाहणी केली. (latest marathi news)

मतदान केंद्राजवळ उमेदवारांचे बूथ होते. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी उमेदवारांनी फिल्डींग लावली होती. धुळे जिल्ह्यासह खानदेशातून एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. महेंद्र भावसार रिंगणात होते. नाशिक, नगर भागातील वीस उमेदवार रिंगणात होते. ॲड. भावसार यांच्यासह चौघांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat : निवडणुकीपूर्वीच महापौरपदाचे बाशिंग! पालकमंत्री शिरसाट यांच्या पुत्राला शुभेच्छा देणारे शहरात झळकले होर्डिंग्ज

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात कंटेनरची तीन वाहनांना धडक, भोस्ते घाटातील घटना

Jinti Mahadev Temple: 'जिंतीच्या महादेव मंदिरात सापडलेल्या शिलालेखात यादवकालीन संदर्भ'; सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर उलगडले दोन लिंगांचे गूढ

Jitendra Awhad: जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्याची ठाण्यात पुनरावृत्ती, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Weight Loss Fruits Breakfast: वजन कमी करण्याचा विचार करताय? मग नाश्त्यात 'या' फळांचे करा सेवन

SCROLL FOR NEXT