gfoegh 
उत्तर महाराष्ट्र

काशी एक्‍सप्रेस इंजिंन मधे बिघाड प्रवाश्‍यांचा खोळंबा जळगाव ः नांद्रा (ता.पाचोरा) येथून जवळच असलेल्या रेल्वेच्या नांद्रा-माहेजी गेट न.135 जवळ आज दुपारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर जाणाऱ्या डाऊन काशी एक्‍सप्रेसच्या इंजिनात अचानक बिघाड झाल्याने ही गा

सकाळ वृत्तसेवा

काशी एक्‍सप्रेस इंजिंन मधे बिघाड प्रवाश्‍यांचा खोळंबा 

जळगाव ः नांद्रा (ता.पाचोरा) येथून जवळच असलेल्या रेल्वेच्या नांद्रा-माहेजी गेट न.135 जवळ आज दुपारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर जाणाऱ्या डाऊन काशी एक्‍सप्रेसच्या इंजिनात अचानक बिघाड झाल्याने ही गाडी तत्काळ थांबवण्यात आली. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचा काही वेळ खोळंबा झाला तर चाळीसगाव आणि पाचोरा येथून जळगावला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने लवकरच उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली आहे. 

अधिक माहिती अशी की, ही रेल्वे गाडी आज नांद्रा-माहेजी गेटजवळून जात असताना इंजिनावर असलेल्या तारेला इंजिनाशी जोडणाऱ्या कनेक्‍टरमधून अचानकपणे आगीचे गोळे व धूर निघू लागल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्याने गाडी माहेजी स्टेशननजीक थांबवली. ही गाडी मुख्य मार्गावर अडकल्याने मागची वाहतूक खोळंबली. त्यातच चाळीसगाव आणि पाचोरा येथून जळगावला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाल्याने त्यांनी बस वाहतुकीने जळगावला जाण्यासाठी नांद्रा स्थानकावर गर्दी केली होती. दरम्यान रेल्वे चालकाने भुसावळ येथे व्यवस्थापनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिल्याने त्याच मार्गावरून पाठीमागून येणारी मालगाडी थांबवून तिचे इंजीन एक्‍सप्रेसला जोडले व तिला पुढे रवाना करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT