उत्तर महाराष्ट्र

जयंत पाटील- फडणवीसांचा एकत्र प्रवास; चर्चा तर होणारच

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्र्यांच्या भावी सहकारी वक्तव्यानंतर या दोघांनी एकत्र येणे, शिवाय एकत्रित प्रवास, व्यासपीठावरील गप्पा हा चर्चेचा विषय ठरला.

शहादा - दोन भिन्न पक्षात असणारे दिग्गज नेते एका कार्यक्रमानिमित्त शहाद्यात येऊन एकाच वाहनात प्रवास केला. या नेत्यांचा व्यासपीठावरील गप्पा व एकाच वाहनाचा प्रवास कार्यकर्त्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. लोणखेडा (ता. शहादा) येथे सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनप्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी पक्षाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले होते.

फडणवीस आणि जयंत पाटील यांनी यावेळी एकाच वाहनातून प्रवास केला. यामुळे शुक्रवारी (ता. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमातील भाषणात टाकलेल्या गुगलीनंतर भाजप सेना पुन्हा एकत्र येणार का या चर्चेने राज्यातील राजकारण ढवळले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावी सहकारी वक्तव्यानंतर या दोघांनी एकत्र येणे, शिवाय एकत्रित प्रवास, व्यासपीठावरील गप्पा हा चर्चेचा विषय ठरला. कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

राज्याच्या सत्ताधारी पक्षाचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका वाहनात प्रवास केल्याचे पाहून तसेच कार्यक्रमस्थळी गप्पा केल्याचे पाहून अनेकांनी वेगवेगळ्या चर्चा केली. अर्थात एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या दोन नेत्यांची कार्यक्रमात भेट झाल्यानंतर साहजिकच दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. ही चर्चा स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT