dhule rashtrawadi sabha 
उत्तर महाराष्ट्र

"राष्ट्रवादी'ची साथ सोडणाऱ्यांना "नो एन्ट्री'! 

सकाळ वृत्तसेवा

शिंदखेडा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडणाऱ्यांना पक्षात पुन्हा "एन्ट्री' दिली जाणार नाही, असे सांगत पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजपला धडाच शिकवावा, जिल्हा परिषदेवर आघाडीची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन केले. 
येथील बिजासनी मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिंदखेडा तालुका शाखेची आढावा बैठक झाली. जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, श्री. बेडसे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, एन. सी. पाटील, विठ्ठलसिंह गिरासे, आधार पाटील, सरचिटणीस सत्यजित शिसोदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

एकदिलाने काम करा 
श्री. बेडसे म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले. त्याचे फलित शिंदखेडा मतदारसंघातील भाजपच्या बालेकिल्ल्यात 70 हजारांपेक्षा अधिक मते आघाडीला मिळाली. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी केली जाईल. श्री. शिंदे म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत "राष्ट्रवादी'ची साथ सोडलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळेल. मतभेद बाजूला ठेवून निवडणूक लढवावी. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करीत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत या तीन पक्षांनी एकत्रित यावे, असे आवाहन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. 

पदाधिकाऱ्यांची नियुक्ती 
माजी आमदार पाटील, श्री. शिसोदे, श्री. गिरासे, आधार पाटील, एन. सी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवचैतन्य संचारले आहे. या निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. बैठकीत मतदारसंघातील अनेक विषयांवर चर्चा आणि योजना आखल्या गेल्या, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षाच्या शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी कैलास बापूराव ठाकरे, जिल्हा उपाध्यक्षपदी बलवंत शिसोदे, जिल्हा उपाध्यक्षपदी साहेबराव तुकाराम मोरे, तर तालुका समन्वयकपदी तथा जिल्हा उपाध्यक्षपदी दुर्गेश मुरलीधर पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांना श्री. शिंदे, श्री. बेडसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान झाले. ऍड. प्रशांत पाटील, वकील पाटील, साहेबराव मोरे, उपसरपंच सुनील लांडगे, रईस बागवान, सचिन परदेशी, हिंमत पाटील, राहुल महाजन, यश आखाडे, शालिक वाकडे, चिराग माळी, प्रदीप बागल आदी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: यंदा मुंबईची तुंबई नाहीच! अंधेरी सबवे लवकरच जलमुक्त होणार, महापालिकेचा मोठा प्लॅन

RBI Governor: महागाई वाढणार? पेट्रोल-डिझेलबाबत गव्हर्नर मल्होत्रा यांचे मोठे वक्तव्य; नेमके काय म्हणाले?

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत फलंदाजांची उडाली त्रेधातिरपीट! पहिल्याच दिवशी पडल्या तब्बल १६ विकेट्स; VIDEO

तुमच्या आरोग्याशी खेळ! कचऱ्याच्या समस्येमुळे महाराष्ट्राची पीछेहाट; पर्यावरणाबाबत सरकार उदासीन का?

Karnataka Cabinet Row : मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच डी.के शिवकुमार यांना मोठा झटका, ज्येष्ठ मंत्र्याचा राजानीमा; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT