job fair esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Job Fair : 27 ला रोजगार मेळावा; या संकेतस्थळावर करा नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Job Fair : 27 जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी २७ ऑक्टोबरला सकाळी दहा ते दुपारी दोनदरम्यान प्रशासकीय संकुल (जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकतांचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये दिली. (Job fair on 27 october in dhule news)

रोजगार मेळाव्यासाठी वैभव प्लेसमेंट्स, नाशिक या कंपनीतील विविध पदांसाठी रिक्त पदे प्राप्त झाली आहेत. याकरिता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येऊन जागेवरच निवड करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच www.ncs.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.

यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील नोकरी साधक (जॉब सिकर) लॉगिनमधून आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटणावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्राइव्ह- १३ पर्याय (२०२३-२०२४) धुळे यांची निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी.

विविध ऑनलाइन सेवा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महास्वयम www.mahaswayam.gov.in पोर्टलच्या विविध लाभार्थी घटक जसे उमेदवार, उद्योजक, नियोक्ते आदींनी या संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावत करणे, रिक्त पदे अधिसूचित करणे, रिक्त पदास अनुसरून ॲप्लाय करणे, तसेच युवक व विद्यार्थी यांना करिअरविषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहनपर कार्यक्रम यामध्ये इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इत्यादी विविध ऑनलाइन सेवा सुविधा उपलब्ध करण्यात देण्यात आल्या आहेत.

या ऑनलाइन सेवा घेताना येणाऱ्या अडचणी, तक्रारींच्या निराकरणासाठी सकाळी आठ ते रात्री आठदरम्यान हेल्पलाइन १८००१२०८०४० उपलब्ध केली आहे.

यांच्याशी संपर्क साधा

अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळासंबंधी संदीप बोरसे (मो. ९८२२२९९८४४) तसेच www.ncs.gov.in संकेतस्थळासंबंधी मुकेश बोरसे (८६००३०३४८७) यांच्याशी संपर्क साधावा.

याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाइन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता इत्यादी कागदपत्रे कंपनीला देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त वाकुडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT