Municipal encroachment removal team while evicting paper shed erected for illegal business.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जुगारअड्डा, पत्र्याची शेड जेसीबीद्वारे जमीनदोस्त; मोगलाईतील संतप्त घटनेनंतर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील साक्री रोड परिसरातील मोगलाई क्षेत्रात भोईवाडा येथे अवैध जुगारअड्ड्याची पक्की रूम व इतर अवैध व्यवसायासाठी उभारलेली पत्र्याची शेड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी पोलिस बंदोबस्तात निष्कासित केली. मोगलाईतील संतप्त घटनेनंतर कारवाईचे शहाणपण यंत्रणेला सुचले. (Jugar Adda Patra shed razed by JCB dhule news)

मोगलाई भागातील भोईवाडा येथे एका मंदिरात विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे समोर आला.

यानंतर या भागात रात्री नशेखोरांचा वावर, मद्यपींचा वावर तसेच काही ठिकाणी अवैध व्यवसाय चालत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जुगारअड्डा व अवैध व्यवसाय चालत असलेली बेकायदा शेड निष्कासित करण्याची सूचना दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिस बंदोबस्तात जुगारअड्ड्याच्या पक्क्या रूम तसेच पत्र्याची शेड जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. मंदिराच्या जवळच हे अतिक्रमण होते. महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव आणि अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस अधिकारी योगेश राजगुरू यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT